Sunday, September 8, 2024
HomeBlogशेअर बाजारात आला Pig Butchering Scam, आमिषाला भाळू नका, सावध राहा :...

शेअर बाजारात आला Pig Butchering Scam, आमिषाला भाळू नका, सावध राहा : Share Market

ऑनलाईन ब्रोकरेज फर्म झिरोधाचे सह सहसंस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अलर्ट जाहीर केला आहे. Pig Butchering Scam पासून त्यांनी गुंतवणूकदारांना चार हात दूर राहण्यास सांगितले आहे. खासकरुन भारतीय गुंतवणूकदारांना अडकवून त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचे समोर आल्याने त्यांनी गुंतवणूकदारांना सतर्क, जागरुक राहण्याचे आवाहन केले आहे. काय आहे हा Pig Butchering Scam?

Fishing Website चा वापर

नितीन कामथ यांनी या प्रकाराविषयी माहिती दिली. त्यानुसार, स्कॅमर, फिशिंग वेबसाईट तयार करतात. या वेबसाईट हुबेहुब भारतीय ब्रोकरेज फर्मसारख्या दिसतात. अशा अनेक वेबसाईट सातत्याने तयार करण्यात येत आहे. या संकेतस्थळावरुन गुंतवणुकीचे सल्ले देण्यात येते. चांगला रिटर्न देण्यात येतो. त्यानंतर मोठी रक्कम गुंतवल्यानंतर फसवणूक करण्यात येते.

चीनमधील भामटे सक्रिय

भारत सरकारने चीनची अनेक कर्ज पुरवठादार एप बंद केल्यानंतर त्यांनी आता हा घोटाळा सुरु केला आहे. चीनमधील भामट्यांनी भारतासह दक्षिण आशियातील काही देशातील गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. हे भामटे चीन व इतर देशातून बनावट वेबसाईट तयार करत आहेत. अशाप्रकारच्या वेबसाईट आणि एप पण तयार करण्यात आले आहे. त्याआधारे गुंतवणूकदारांची फसवणूक होत आहे.

Pig Butchering Scam म्हणजे काय ?

नितीन कामथ यांनी या फसवणुकीला Pig Butchering Scam असे म्हटले आहे. पिग म्हणजे डुक्कर, तर डुकराला कापण्यापूर्वी, त्याला खाऊ-पिऊ घालण्यात येते. या घोटाळ्यात पण सायबर भामटे हीच पद्धत वापरतात. ते अगोदर गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवतात. नंतर त्यांना चुना लावतात.
गुंतवणूकदारांन सुरुवातीला गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येतो. गुंतवणूकदाराने रक्कम गुंतवली की, त्यांना चांगला परतावा देण्यात येतो. त्यांना अधिक गुंतवणुकीसाठी आणि मोठ्या परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात येते. शेअर ब्रोकर फर्मकडून अशी ऑफर येत असल्याने गुंतवणूकदार जादा आमिषाने गुंतवणूक वाढवतो. एकदा मोठी रक्कम गुंतवली की घात होतो. रक्कम गायब होते.

अनोळखी लिंकवरुन कोणतेही एप डाऊनलोड करु नका. ब्रोकरेज फर्मचेच एप आहे की नाही, वेबसाईट ब्रोकरेज फर्मचीच आहे की नाही, याची खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करु नका. जादा आमिष दाखविणाऱ्या योजनांपासून चार हात दूर राहा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -