दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे. दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात विषय वाढणार आहेत. जास्त विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे सीबीएसई दहावी आणि बारावीच्या माध्यमिक स्तरावर मोठे बदल सुचवले आहेत. त्यानुसार दहावीला दहा विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे तर बारावीला सहा विषय असणार आहेत. सीबीएसईकडून शाळांना या संदर्भात सूचना देण्याचे म्हटले होते. शाळांकडून सूचना आल्यानंतर हे बदल होणार आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून हे बदल होणार आहेत.
पक्ष हातून गेल्यावर शरद पवारांची जुन्या खेळीने नवी सुरुवात … डाव मोठा
काय, काय आहेत बदल
दहावीमध्ये दोनऐवजी तीन भाषांची सक्ती असणार आहेत. त्यातील दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. तसेच अकरावी-बारावीत एक ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यातही एक भारतीय भाषा असणार आहे. तसेच नववी-दहावीत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी विषयांची संख्या वाढवली आहे. पाच ऐवजी दहा विषय शिकावे लागणार आहेत. त्यात तीन भाषा तर सात मुख्य विषय असणार आहेत. या विषयांमध्ये गणित, संगणक शास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण यांचा समावेश आहे.
राशिभविष्य : रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024
बारावीसाठी केले हे बदल
दहावी प्रमाणे अकरावी-बारावीच्या स्तरावर बदल केला आहे. आता बारावीत दोन भाषा आणि चार मुख्य विषय असणार आहे. बारावीत सर्व विषयांचे चार गटात विभागणी होणार आहे. त्यात भाषा, कला, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, सामाजिक विज्ञान, आंतरविद्याशाखीय विषय, गणित, विज्ञान हे विषय असे चार गट असणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार दहावी, बारावीत बदल केला आहे. हा बदल करताना भारतीय भाषांची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य विषयांचा ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, याबाबत विचार केला गेला आहे. आता यासंदर्भात शाळांकडून सूचना आल्यानंतर त्याचा अभ्यास करुन हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.