Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रशिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांचं भाषण, आंदोलकांकडून ‘ एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा

शिवनेरीवरून मुख्यमंत्र्यांचं भाषण, आंदोलकांकडून ‘ एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा

शिवजयंतीनिमित्त आज राज्यभरात आज उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज, शिवनेरीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते जन्म सोहळा संपन्न झाला. .

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केलं. हे राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य आहे, असं सांगत राज्य सरकार राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती दिली.

 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांच्या घोषणामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. मात्र त्यांच्या भाषणादरम्यान शिवनेरीवर मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरू असताना मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या .

 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन

 

शिवनेरीवरून उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केल. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार. ‘

 

ही बातमी अपडेट होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -