Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगआंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीला दराची झळाळी, देशांतर्गत बाजारात काय स्थिती?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीला दराची झळाळी, देशांतर्गत बाजारात काय स्थिती?

सोने चांदी (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. डॉलर निर्देशांक कमजोर झाल्यामुळं दरात वाढ होतेय. COMEX वर सोन्याचा दर प्रति ऑन 2041 डॉलरवर व्यापार करत आहे.

बुधवारी सराफा बाजारात उत्साह होता. डॉलरच्या सततच्या कमजोरीमुळं सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीने आठवडाभरातील उच्चांक गाठला आहे. आज उशिरा जाहीर होणारा डॉलर आणि फेड मिनिट्सचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे.

देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात वाढ

देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. MCX वर, सोन्याचा दर सुमारे 60 रुपयांच्या वाढीसह 62224 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. चांदीचा भावही 135 रुपयांनी वाढून 71390 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती वाढत आहेत. COMEX वर डॉलरच्या कमजोरीमुळं, सोन्याचा दर प्रति ऑन 2041 वर व्यापार करत आहे. चांदीची किंमत देखील थोड्या मजबूतीसह 23.18 प्रति डॉलर ऑनवर व्यवहार करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -