Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंगशेअर बाजारात इरडचा शेअर दाखवणार कमाल, देशात लवकरच सोलर युग

शेअर बाजारात इरडचा शेअर दाखवणार कमाल, देशात लवकरच सोलर युग

भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था लिमिटेडचा ( IREDA) शेअर सध्या चर्चेत आहे. गेल्यावर्षी या सरकारी कंपनीचा आयपीओ आला होता. इरडाच्या आयपीओने गुंतवणूकदारांना मालामाल केले होते. त्यांना अवघ्या काही दिवसातच 400 टक्क्यांचा परतावा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये विक्रीचे सत्र सुरु आहे. या शेअरमध्ये सातत्याने लोअर सर्किट लागत आहे. पण या शेअरमध्ये लवकरच उसळीचे संकेत मिळत आहे. कारण इरडाने नवीन कंपनी गठीत करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

काय आहे योजना

 

इरडाचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक प्रदीप कुमार दास यांनी रुफटॉप सोलर, पीएम-कुसुम, इलेक्ट्रिक वाहन आणि बिझनेस टू कंझ्युमर कॅटेगिरीशी संबंधित योजना पूर्ण करण्यासाठी एक सहाय्यक कंपनी असावी यासाठी इरडात खलबंत सुरु आहे. भारत सरकारकडून मंजूरी मिळाल्यावर इरडा किरकोळ बाजारातील गरजा पूर्ण करण्यासाठी एक सहायक कंपनी सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

इलेक्ट्रिक वाहने, ग्रीन हायड्रोजन आणि ऑफशोर विंड सारख्या तंत्रज्ञानासहीत विविध अक्षय ऊर्जा प्रकल्पावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. कर्जदारांची चिंता मिटवण्यासाठी आणि जोरदार प्रदर्शनासाठी, एनपीए कमी करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कंपनीने कंबर कसली आहे.

कंपनीने देशभरात विविध प्रकल्प राबविण्यासाठी अक्षय ऊर्जा प्रकल्पावर काम करण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम केली. कंपनीने त्यासाठी पंजाब नॅशनल बँकेसोबत करार केला आहे. त्याआधारे विविध प्रकल्प पूर्ती करता येईल आणि पतमानांकन आणि इतर मानांकनात परिस्थिती सुधारण्यासाठी या वित्तीय सहायाची मदत होईल.

शेअरची किंमत

 

बुधवारी इरडाच्या शेअरच्या किंमतीत 5 टक्के घसरण दिसून आली. हा शेअर 166.35 रुपयांपर्यंत घसरला. तर 6 फेब्रुवारी रोजी हा शेअर 215 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला होता. इरडाच्या शेअरने गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात प्रवेश केला होता. हा शेअर सूचीबद्ध झाला होता. हा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी 50 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईस 32 रुपये होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -