Saturday, December 21, 2024
Homeतंत्रज्ञान300 युनिट वीज मिळवा मोफत! PM Surya Ghar Yojana साठी असा करा...

300 युनिट वीज मिळवा मोफत! PM Surya Ghar Yojana साठी असा करा अर्ज

1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटमध्ये सौरऊर्जा योजनेची घोषणा केली होती. पीएम सूर्योदय योजनेची (PM Suryoday Yojana) घोषणा करण्यात आली होती. त्यातंर्गत ग्राहक त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्यास 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. त्यातून त्यांना वार्षिक 18,000 रुपयांचा फायदा होणार आहे. पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा 22 जानेवारी रोजी केली होती. सरकारने या मोफत इलेक्ट्रिसिटी योजनेला पीएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana) असे नाव देण्यात आले आहे. या योजनेत कसा अर्ज करावा, त्यासाठी काय प्रक्रिया आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. जाणून घ्या, काय आहे ही योजना? PM Surya Ghar Yojana

मिळणार सबसिडी

PM Surya Ghar Yojana ग्राहकांना सबसिडी मिळणार
ग्राहकांना या योजनेतंर्गत 300 युनिट वीज मोफत मिळणार

बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड: अप्लाय कसे करायचे, चार्जेस, कागदपत्रे | Bajaj Finserv EMI Card

अधिक वीज उत्पादन झाले तर त्यातून 18000 रुपयांपर्यंत कमाई करता येईल
या योजनेसाठी केंद्र सरकारने 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे
बँकेत या योजनेसाठी कर्ज मागितल्यास त्यावर ग्राहकांना सवलत पण मिळणार
या योजनेसाठी ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करता येईल
अर्ज करण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल
Rooftop Solar Scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल

‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आज उद्या अटक होणार; शरद पवार यांचं मोठं विधान

या नागरिकांना योजनेचा फायदा PM Surya Ghar Yojana

सूर्योदय योजनेतंर्गत सरकार एक कोटी घरांवर सौर ऊर्जेसाठी पॅनल बसवणार आहे. त्यासाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. सोलर पॅनलच्या मदतीने मोफत वीज मिळेल. ज्यांच्या घरावरील छतावर सोलर पॅनल बसविता येणार आहे, त्या कुटुंबांना या योजनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ही योजना गरीब आणि मध्यमवर्गासाठी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना फायदा होईल.

Airtel Plan: एक वर्षांपर्यंत रिचार्ज करावा लागणार नाही, सगळ्यात स्वस्त प्लान

कोणाला करता येईल अर्ज PM Surya Ghar Yojana

कोणताही भारतीय नागरीक, संस्था
स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी
हे घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सुविधा असावी
अर्जदाराकडे वीज जोडणी असावी

असा करा अर्ज

https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration वर जा
या ठिकाणी नाव, पत्ता आणि इतर संपूर्ण तपशील भरा
या ठिकाणी सबसिडी किती मिळणार हे पण तपासता येईल.
भविष्यात या योजनेत केवळ घराच्या छतावरच नाही तर शेत, मोकळ्या जागेवर पण सोलर पॅनल लावतील. PM Surya Ghar Yojana

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -