Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगदूर्धर आजारावर पण इलाज! आयुष्यमान भारत योजनेत या मोठ्या शस्त्रक्रिया होणार

दूर्धर आजारावर पण इलाज! आयुष्यमान भारत योजनेत या मोठ्या शस्त्रक्रिया होणार

कोणत्याही आजारावर उपचारासाठी तुम्ही रुग्णालयात पोहचता, त्यावेळी उपचारासाठी मोठा खर्च येतो. भल्याभल्यांची बचत साफ होते. सर्वसाधारण आजारावर उपचारासाठी मोठा खर्च येतो. गरीबांना तर खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्यातच नसतो. शासकीय रुग्णालयात त्यांना उपलब्ध उपचार करावा लागतो. त्यासाठीच केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना आणली आहे. त्यामध्ये देशातील कोट्यवधी गोरगरिबांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येतात. या योजनेत मोठंमोठ्या शस्त्रक्रिया करता येतात.

अनेक आजारांवर होतो इलाज

आयुष्मान भारत योजनेमध्ये 1760 प्रकारच्या आजारांवर इलाज करण्यात येतो. आता यामध्ये 196 आजार आणि शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयात या आजारावर या योजनेतंर्गत उपचार होत नाही. यामध्ये मोतीबिंदू, सर्जिकल डिलिव्हरी, मलेरिया यासह इतर अनेक आजारांचा समावेश आहे.

या शस्त्रक्रिया करता येतील

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोण-कोणत्या सर्जरी तुम्ही करु शकता, हे तुम्हाला माहिती आहे का? आयुष्यमान भारत योजनेतंर्गत प्रोस्टेट कँसर, डबल वॉल्व रिप्लेसमेंट, कोरोनरी आर्टरी बायपास, पल्मनरी वॉल्व रिप्लेसमेंट, स्कल बेस सर्जरी, टिश्यू एक्सपेंडर, पीडियाट्रिक सर्जरी, रेडिएशन ओंकोलॉजी, न्यूरोसर्जरी, अँजियोप्लास्टी विद स्टेंट या सारख्या शस्त्रक्रिया करता येतात. या योजनेतंर्गत ही सर्जरी तुम्ही खासगी रुग्णालयात पण करु शकता.

80 टक्क्यांहून अधिक रुग्णांवर उपचार

आयुष्यमान भारत योजना लागू झाल्यापासून या योजनेत 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अनेक रुग्णालये या योजनेतंर्गत उपचार करतात. पण अजूनही अनेक मोठी रुग्णालये आणि इतर इस्पितळात उपचार होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतो. त्यांना अधिक खर्च करावा लागतो. खासकरुन आपत्कालीन परिस्थितीत, पैसे नसल्यास मोठी अडचण येते. अनेकदा मोठंमोठी रुग्णालये उपचार घेण्यास नकार देतात. कारण ही रुग्णालये या योजनेत बसत नाहीत. प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक या योजनेतंर्गत उपचार घेतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -