Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशअर्जंट 3 लाखांचे कर्ज, प्रमाणपत्र : विश्वकर्मा योजना : आत्ताच करा अर्ज...

अर्जंट 3 लाखांचे कर्ज, प्रमाणपत्र : विश्वकर्मा योजना : आत्ताच करा अर्ज : loan Aprove

देशातील छोट्या मोठ्या व्यवसाय यांना चांगली बळकटी मिळावी. आणि या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाला चांगला रोजगार मिळावा चांगली प्रगती व्हावी यासाठी सरकारने विश्वकर्मा नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे तीन लाखापर्यंत चे कर्ज, आणि या योजनेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र ही दिले जाते.Vishwakarma Yojana

योजनेमध्ये सुतार, सोनार, लोहार, न्हावी, धोबी, मूर्तिकार, लहान मुलांची खेळणी बनवणारे, झाडू बनविणारे, चटई बनवणारे, हातोडा आणि टूलकिट बनवणारे अशा कारागिरांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे सरकार तीस लाखांच्या परिवाराला सक्षमीकरण करणार आहे.Vishwakarma Yojana loan

या योजनेद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्यांना चाळीस तासांचे म्हणजेच पाच ते सात दिवसांचे विनाशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि या प्रशिक्षण काळात रुपये पाचशे प्रतिदिन मानधन दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर रुपये पंधरा हजार पर्यंत टूल किट साठी दिले जाणार आहेत.Vishwakarma Yojana loan

यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला एक लाख रुपये पाच टक्के व्याज दराने लाभार्थीला दिले जाणार आहेत. यानंतर 18 महिने पूर्ण हप्ते जाऊन पहिली घेतलेली रक्कम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वेळेला दोन लाखांपर्यंत कर्ज तीस महिन्यासाठी दिले जाणार आहे.

या योजनेचे संपूर्ण नाव पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना असे असून याची घोषणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. या योजनेसाठी सरकार 13000 करोड रुपयांचा बजेट खर्च करणार आहे आणि याचा फायदा 30 लाख लोकांना होणार आहे.Vishwakarma Yojana loan

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो फोन नंबर जातीचे प्रमाणपत्र रहिवाशी दाखला इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

या योजनेमुळे चांगली आर्थिक मदत जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रवेश प्रगत कौशल्य प्रशिक्षण अशा विविध प्रकारचा फायदा यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक कारागिऱ्याला मिळू शकतो.

तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच सरकारद्वारे दिले जाणारे तीन लाखांपर्यंत कर्ज व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून सविस्तर माहिती आपण घेऊ शकता.

अधिक माहितीसाठी- www.india.gov.in ही वेबसाईट पहावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -