Sunday, September 8, 2024
Homeतंत्रज्ञानव्हॉट्सअ‍ॅपचं भन्नाट फीचर! एकाच फोनमध्ये वापरता येणार दोन अकाउंट्स

व्हॉट्सअ‍ॅपचं भन्नाट फीचर! एकाच फोनमध्ये वापरता येणार दोन अकाउंट्स

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट (feature) आणत असते. जगभरात कोट्यवधी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. ज्यामुळे आपल्याला अनेक लोकांशी कनेक्ट होता येणार आहे. अशातच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये भन्नाट फीचर लॉन्च केले आहे. लेटेस्ट अपडेटद्वारे व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एकाच वेळी दोन अकाउंट वापरता येणार आहे.

याची माहिती यापूर्वी WAbetainfo या वेबसाइटने दिली होती. परंतु, हे फिचर लॉन्च झाले नव्हते. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केल्यानंतर युजर्सला ही या फीचरचा (feature) फायदा घेता येणार आहे. जर तुमच्या फोनमध्ये ड्युअल सिम असेल तर तुम्हाला एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअ‍ॅपची खाती वापरता येणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही दुसरे अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार नाही.

तसेच यात तुम्हाला बिझनेस अकाउंटही सहज वापरता येणार आहे. हे मल्टीपल अकाउंट सध्या Android वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. लवकरच iOS मध्ये रोल आउट होण्याची अपेक्षा आहे. तसेच हे काही प्रदेशात अद्याप उपलब्ध नसल्याचे देखील कंपनीने सांगितले आहे. रोलआउट देखील टप्प्याने होईल.

1) जर तुमच्याकडे ड्युअल सिम कार्डला सपोर्ट करणारा फोन असेल तर आधी व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा.

2) अपडेट झाल्यानंतर फोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. सेटिंग्जवर क्लिक करुन नवीन खातेवर जा.

3) तुमचा दुसरा फोन नंबर एंटर करा आणि पुढील टॅपवर क्लिक करा.

4) एसएमएसद्वारे तुम्हाला कोड येईल. पडताळणी झाल्यानंतर तुम्ही दुसरे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सहज सेट करु शकता.

5) वरच्या डाव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइलवर टॅप करा.

6) जेव्हा तुम्हाला वापरायचे असेल तेव्हा खात्यावर क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -