यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी बल्गेरियात झाला. बाबा वेंगा हे लहानपणापासूनच दृष्टिहीन होते. त्यांच्याकडून अनेक भाकिते केली गेली आहेत जी खरी ठरली आहेत, म्हणून त्यांना गूढवादी देखील म्हटले गेले. 1996 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले परंतु मृत्यूपूर्वी त्यांनी 5079 पर्यंत भविष्यवाणी केली होती.
बाबा वेंगा एक बल्गेरियन महिला होत्या, ज्यांच्या अनेक भविष्यवाण्या खरे ठरल्या आहेत. त्या जगातील प्रसिद्ध भविष्यकारांपैका एक आहेत. त्यांनी 2024 साठीसुद्धा काही भाकितं केली होती. त्यापैकी एक भाकित खरे ठरल्याची चर्चा आहे.हे भाकित नुकतेच खरे ठरले
बाबा वेंगा यांनी 2024 पर्यंत कर्करोगाची लस विकसित केली जाईल असे भाकीत केले होते. जगभरातील अनेक देशांमध्ये कर्करोगाच्या लसीच्या चाचण्याही सुरू आहेत. 2024 च्या त्यांच्या दुसऱ्या भविष्यवाणीत, बाबा वेंगा यांनी जगातील आर्थिक संकटाबद्दल सांगितले होते. या अंदाजानुसार, कोरोनाच्या काळात अनेक देशांच्या जीडीपीमध्ये मोठी घट दिसून आली.
हे भाकित आतापर्यंत खरे ठरले आहेत
बाबा वेंगा यांनी अमेरिकेतील अल कायदा या दहशतवादी संघटनेने 9/11 च्या हल्ल्याचा अंदाजही वर्तवला होता, जो तंतोतंत खरा ठरला. जे पूर्णपणे खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. यासोबतच त्यांनी सोव्हिएत युनियनच्या विघटनाचीही भविष्यवाणी केली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी सन 5079 पर्यंत भविष्यवाणी केली होती. इतकंच नाही तर बाबा वेंगा यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मृत्यूची भविष्यवाणीही केली होती.भविष्यात काय होईल?
बाबा वेंगाच्या अंदाजानुसार येत्या काळात रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांनी युरोपमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचा इशाराही दिला असून आगामी काळात एखादा मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी घेऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. 2024 या वर्षासाठी त्यांनी भयानक हवामानाशी संबंधित घटनांचाही उल्लेख केला आहे, ज्याचा प्रभाव संपूर्ण जगावर दिसून येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)