Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगनमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये 'या' दिवशी मिळणार; 1792 कोटी मंजूर, वाचा...

नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार; 1792 कोटी मंजूर, वाचा जीआर

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ (Namo Shetkari Yojana) राबवली जाते.या योजनेचा 2000 रुपयांचा दुसरा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. जवळपास राज्यातल्या 90 लाख शेतकऱ्यांना हा दुसरा हफ्ता दिला जाणार असून, त्यासाठीच्या खर्चापोटी 1 हजार 792 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा (Namo Shetkari Yojana) जीआर राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

 

काय आहे ‘ही’ योजना? (Namo Shetkari Yojana 1 Thousand 792 Crore Approved)

 

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना’ सुरु केलेली आहे. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारकडून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू राबवली जाते. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक 6000 रुपये तर मिळतातच. याशिवाय राज्य सरकारकडून देखील वार्षिक 6000 रुपये मिळतात. अर्थात दोन्ही योजनांच्या माध्यमातून एकत्रितपणे अशी एकूण १२००० रुपये वार्षिक आर्थिक मदत मिळते. या योजनेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेप्रमाणेच प्रत्येक चार महिन्याला राज्यातील शेतकऱ्यांना २००० रुपये वितरित केले जातात.

 

कधी मिळणार दुसरा हफ्ता?

 

राज्य सरकारकडून एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीत या योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. सरकारकडून राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यासाठी 1 हजार 720 कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या कालावधीतील दुसरा हप्ता, चालू फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ९० लाख शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे आता या महिन्याच्या शेवटी राज्य सरकाराकडून २००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.

 

दरम्यान, राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची मागील वर्षीच्या मार्च महिन्यात घोषणा झाल्यानंतर, राज्य सरकारकडून एक विशेष मोहीम राबवली आली. ज्यामुळे या योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता करण्यात आली आहे. परिणामी,

सध्यस्थितीत राज्यात योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे 13 लाख शेतकऱ्यांची वाढ झाली असल्याचे राज्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

 

अधिक माहितीसाठी वाचा जीआर : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/2024022116581026)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -