Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानJio चा 84 दिवसांचा नवा रिचार्ज प्लॅन; Airtel- Vi ची झोप उडणार?

Jio चा 84 दिवसांचा नवा रिचार्ज प्लॅन; Airtel- Vi ची झोप उडणार?

प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कमी पैशात मोबाईल रिचार्ज असल्याने अनेक ग्राहक एअरटेल आणि वोडाफोन आयडियाची साठी सोडून जिओचे कार्ड खरेदी करत आहेत. त्यामुळे मार्केट मध्ये Jio- Airtel आणि VI अशी तिहेरी लढत नेहमीच पाहायला मिळतेय. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच कंपन्या नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असतात . आताही जिओने आपल्या ग्राहकांसाठी असाच एक नवा रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्यामुळे Airtel- Vi ची झोप उडू शकते.

 

Play Video

Close PlayerUnibots.com

आम्ही तुम्हाला ज्या प्लॅन बद्दल सांगत आहोत तो आहे जिओचा 1,198 रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) आहे. तुम्हाला जर अनलिमिटेड कॉलिंग, फास्ट इंटरनेट आणि मोठ्या व्हॅलिडिटी चा रिचार्ज हवा असेल तर जिओ चा 1,198 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय ठरेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला ज्या काही सुविधा देण्यात आल्यात त्या इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे. हा मोबाईल रिचार्ज प्लान 84 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो.

 

काय मिळतात फायदे – Jio Recharge Plan

Jio च्या या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला दररोज 2GB इंटरनेट डेटा म्हणजेच एकूण 168GB डेटा उपलब्ध करण्यात आला आहे. म्हणजेच ज्यांना रोज जास्त इंटरनेट वापरायला लागते त्यांना हा प्लॅन परवडतोय. याशिवाय 1,198 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS चा लाभही वापरकर्त्यांना मिळत आहे. या रिचार्ज प्लॅन अंतर्गत Sony LIV, Zee5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मचा सुद्धा लाभ मिळू शकतो. त्यामुळे विचार केला तर हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना अतिशय परवडणारा असा प्लॅन आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -