Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंगआता कसा लावाल गुंतवणूकदारांना चुना! प्रयत्न केला तर AI झटकन पकडणार

आता कसा लावाल गुंतवणूकदारांना चुना! प्रयत्न केला तर AI झटकन पकडणार

  1.  शेअर बाजारात हेरा-फेरी करणाऱ्यांना लवकरच चपराक बसणार आहे. अशा भामट्यांना पकडण्यासाठी मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) फुलप्रुफ तयारी केली आहे. त्यामुळे असे काम करणारे लवकर पकडले जातील. तसेच बाजारातील अशा प्रकारांना पण आळा बसणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फसवणूक करणाऱ्या ब्रोकरला पकडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence -AI) वापर करण्यात येणार आहे. कसे काम करेल हे तंत्रज्ञान, जाणून घ्या…

आता एआयचा वापर होणार

 

मार्केट रेग्युलेटर सेबीचे सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी एका कार्यक्रमादरम्यान शनिवारी याविषयीची माहिती दिली. त्यांनी शेअर बाजारात गडबड करणाऱ्यांना पकडण्यासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गुंतवणूकदारांना फसवणाऱ्यांना लगाम घालता येईल. लवकरच सेबी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार आहे.

बाजारात येईल पारदर्शकता

 

दिल्लीत नुकतेच असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंजेज मेंबर्स ऑफ इंडियाचे 13 वे आंतरराष्ट्रीय संमेलन झाले. त्यात कमलेश वार्ष्णेय यांनी सेबीद्वारे AI तंत्रज्ञानाच्या वापराविषयी माहिती शेअर केली. बाजारात पारदर्शकता वाढावी आणि गडबडीला आळा बसावा यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. सातत्याने याविषयीची कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

गुंतवणूकदारांचा विश्वास सर्वात महत्वाचा

 

सेबीने टाकलेल्या पावलांविषयी वार्ष्णेय यांनी माहिती दिली. गुंतवणूकदारांचा विश्वास हा सर्वात महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे. जर तेच नसतील तर या सिस्टिमला अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ब्रोकर गडबड करत आहेत. त्यांच्यावर बारीक लक्ष आहे. पण या प्रकाराला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.

 

नियमांचे उल्लंघन पडेल महागात

 

सेबीच्या नियमांचे उल्लंघन करणे महागात पडेल, असे सेबीने स्पष्ट केले आहे. गडबड थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पण नियमांचे उल्लंघन केल्यास अशा ब्रोकर्सवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आता लवकरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापरामुळे ही गडबड लक्षात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -