Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रगरुडझेप’ कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

गरुडझेप’ कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या बजाजनगर भागातील गरुड झेप अकॅडमीचा (coaching center) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अकॅडमीतील कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगरमध्ये असलेली गरुड झेप अकॅडमी आता चांगलीच चर्चेत आली आहे. डिसेंबर महिन्यात एका विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली होती.

त्यानंतर 2 दिवसापूर्वीच एका मुलीने देखील आत्महत्या केली. त्यानंतर या अकॅडमीचा (coaching center) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ‘गरुडझेप’ कोचिंग सेंटर की छळछावणी असा प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहे. अकॅडमीतील कर्मचाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली जात असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांकडून थंड पाणी टाकून लाकडी दांड्याने अमानुषपणे मारहाण केल्याचंही स्पष्ट दिसतंय.

 

या घटनेमुळे आता अकॅडमीवर (coaching center) प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे पालक वर्ग संताप व्यक्त करत आहेत. यावर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान या अकॅडमीमध्ये पोलीस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींचा प्रचंड छळ सुरू आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली कडाक्याच्या थंडीत अंगावर पाणी टाकून काठी आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

तरूण-तरूणी आपली स्वप्न घेऊन अकॅडमीमध्ये प्रवेश घेतात. पालक पैसे भरून आपल्या मुलांना शिकण्यासाठी पाठवतात. त्यांना या अकॅडमीमध्ये अशी भयंकर वागणूक मिळत आहे. गरुड झेप अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

 

यापूर्वी याच अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी रोजी घडली होती. लिना श्रीराम पाटील, असं मृत तरुणीचं नाव आहे. अकॅडमीत होणाऱ्या छळाला कंटाळून तिने असा निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं. अकॅडमीत तिला अपमानास्पद वागणूक मिळाली.

छळाला कंटाळून तिने गळफास घेतला होता.लिनाला खानावळीचे पैसे भरण्यास उशीर झाल्यावर तिला साधा नाश्ताही दिला जात नव्हता. इतर प्रशिक्षणार्थीसमोर अपमानास्पद वागणूक मिळत होती. ‘तू काळी आहेस, असं हिणवले जात होती. या सगळ्या प्रकारामुळे लीना तणावात गेली होती, अशी माहिती मिळतेय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -