रविवारी इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावांवर आटोपला. टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांच टार्गेट मिळाल. भारताने नाबाद 40 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा 24 आणि दुसरा सलामीवर यशस्वी जैस्वाल 16 धावांवर खेळतोय.रांची टेस्टमध्ये टीम इंडिया चांगल्या स्थितीमध्ये आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी फक्त 152 धावांची आवश्यकता आहे.
टीम इंडियाकडे अजून 10 विकेट शिल्लक आहेत. इंग्लंडने भारताला विजयासाठी 192 धावांचा टार्गेट दिलय. टीम इंडियाच्या बॉलिंग युनिटने इंग्लंडला दुसऱ्या डावात बॅकफूटवर ढकलल्यानंतर हे शक्य झालं. भारतीय टीम दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना अंपायरिंगवरुन सुद्धा वाद झाला.
कारण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अनेकदा अपील करुनही अंपायर्सनी दाद दिली नाही. त्यामुळे टीम इंडियाला नुकसान सहन कराव लागलं.इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 30 व्या ओव्हरमध्ये हे घडलं. रवींद्र जाडेजाने आपल्या एका चेंडूवर इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सला ट्रॅप केलं. रवींद्र जाडेजाने जोरदार अपील केलं. पण अंपायरने नॉटआऊट दिलं. त्यावेळी रवींद्र जाडेजा कॅप्टन रोहितकडे DRS कॉल घेण्याची मागणी करत होता.त्याचा व्हिडिओ व्हायरल
रोहित शर्मा त्यावेळी बॉलर, किपर आणि अन्य प्लेयरशी सल्लामसलत करत होता. त्यावेळी गमतीने रोहित म्हणाला की, भाई डोकं लाव नीट…. त्याचवेळी डीआरएस घेऊ. चेंडू बाहेर गेल्याच रोहितला सांगण्यात आलं. कोणी म्हणत होतं की, चेंडू समोर पडलाय. ही मजेदार चर्चा स्टम्पसला लावलेल्या माइकमध्ये रेकॉर्ड झाली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.रोहितचा 4 हजार धावांचा टप्पा पार
रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवने मिळून नऊ विकेट घेतले. तिसऱ्या दिवशी रविवारी इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावांवर आटोपला. टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांच टार्गेट मिळाल. भारताने नाबाद 40 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा 24 आणि दुसरा सलामीवर यशस्वी जैस्वाल 16 धावांवर खेळतोय. रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमध्ये रविवारी 4 हजार धावांचा टप्पा पार केला.