देशात बहुतांश लोक कर भरण्यास टाळाटाळ करतात. आपल्यासारख्या सामान्य माणसाला कल्पनाही नसते कि, एखाद्या दुकानातून किंवा हॉटेल मधून बिल न घेता आपण तसेच निघालो तर त्या दुकान किंवा हॉटेल मालकाला आपण करचोरी करण्याची संधी देतो.
देशात मोठयाप्रमाणात होणारी हि करचोरी थांबवण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार एक नवीन योजना घेऊन आली आहे जिचे नाव आहे मेरा बिल मेरा अधिकार योजना.आजच्या या पोस्ट मध्ये आपण या Mera Bill Mera Adhikar Yojana in Marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Mera Bill Mera Adhikar Yojana:
या योजनेअंतर्गत सरकार 10 लाख ते 1 कोटी रुपयांचे रोख बक्षीस देणार आहे. या योजनेचा लाभ कसा मिळवावा आणि कोण पात्र असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा लेख सविस्तर वाचावा लागेल. कारण आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे मेरे बिल मेरा अधिकार योजना 2023 शी संबंधित संपूर्ण माहिती प्रदान करू.Government Lottery
देशात सातत्याने होणारी करचोरी थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून हि मेरा बिल मेरा अधिकार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिक त्यांनी विविध ठिकाणी मिळवलेली GST बिले अपलोड करून रोख बक्षिसे जिंकू शकतील.
मेरा बिल मेरा अधिकार योजना द्वारे GST अंतर्गत खरेदी केलेल्या वस्तूंचे GST bill सरकारच्या Mera Bill Mera Adhikaar या मोबाइलला app वर अपलोड करणार्यांना रोख बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल.
मेरा बिल मेरा अधिकार योजनेंतर्गत, मोबाइल अॅपवर GST bill अपलोड केल्यास सर्वसामान्यांना बक्षीस मिळेल. हे बक्षीस 1 कोटी रुपयांपर्यंत असू शकते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला दरवेळी काहीही खरेदी केल्यास त्याचे GST बिल त्या त्या दुकानदाराकडून आठवणीने मागावे लागेल आणि आपल्या मोबाईल मध्ये मेरा बिल मेरा अधिकार या app मध्ये सर्व बिले अपलोड करावी लागतील. Government Lottery
अशाप्रकारे lucky-draw च्या माध्यमातून सहभागींना 1 कोटी रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. कोणताही सामान्य नागरिक GST बिल अपलोड करून मेरा बिल मेरा अधिकार योजनेचा लाभ घेऊ शकतो.
मेरा बिल मेरा अधिकार योजना केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2023 रोजी 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत बक्षिसांच्या रकमेसाठी 30 कोटी रुपयांचे बजेट सरकारकडून तयार करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, मेरा बिल मेरा अधिकार योजनेसाठी आतापर्यंत 50,000 हून अधिक लोकांनी मोबाइल अॅप डाउनलोड केले आहे.
भारत देशातील कोणत्याही राज्याचा निवासी हि app डाउनलोड करून GST बिले अपलोड करू शकतो. ग्राहक त्यांची बिले अपलोड करून या योजनेत सामील होऊ शकतात आणि लकी ड्रॉद्वारे करोडो रुपयांची बक्षिसे जिंकू शकतात.
तथापि प्रथमदर्शी प्रायोगिक तत्वावर केवळ आसाम, गुजरात, हरियाणा, पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये भरलेली GST बिले च या योजनेसाठी ग्राह्य धारली जातील.
या राज्यांमध्ये हि योजना यशस्वी झाल्यास लवकरच संपूर्ण देशात लागू केली जाईल.
या योजनेअंतर्गत दर महिन्याला 810 लकी ड्रॉ होतील. ज्यामध्ये दर महिन्याला एका सोडतीमध्ये 800 लोकांना 10,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल आणि 10 लोकांना 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
प्रत्येक तिमाहीत 1 कोटी रुपयांचा एक बंपर lucky draw दिला जाईल. या योजनेचा फायदा नागरिक, ग्राहक आणि सरकार यांना होणार आहे.
मेरे बिल मेरा अधिकार योजनेचे उद्दिष्ट
केंद्र सरकारची मेरा बिल मेरा अधिकार योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश करचोरी रोखणे हा आहे. जेणेकरून लोक या योजनेत सहभागी होऊन खरेदी केलेल्या वस्तूंचे दुकानदार किंवा व्यावसायिकाकडून जीएसटी बिल घेऊ शकतील आणि जेव्हा लोक बिल मागू लागतील, तेव्हा जीएसटी बिल न देता कर वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिकांवर यामुळे आला घातला जाईल.
तसेच, सर्वसामान्यांना करोडो रुपयांची रोख बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेद्वारे, मोबाईल अॅपवर GST bill अपलोड करणाऱ्या सामान्य लोकांना सरकारकडून बक्षीस दिले जाईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना GST बिल जमा करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. रोख बक्षीस कसे मिळवायचे?
मेरा बिल मेरा अधिकार योजनेअंतर्गत, 1 ते 3 महिन्यांच्या आधारावर लोकांकडून जमा केलेली GST बिले लकी ड्रॉमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.
ज्यासाठी सरकारने काही आवश्यक नियम लागू केले आहेत जसे की, संगणकाच्या मदतीने दर महिन्याला ५०० लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. ज्यामध्ये सहभागींना लाखो रुपयांची बक्षिसे मिळू शकतात.
याशिवाय दर ३ महिन्यांनी असे दोन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यामुळे सहभागींना 1 कोटी रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल.
मेरा बिल मेरा अधिकार योजनेत सहभागी होण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या खरेदी केलेल्या वस्तूंची बिले जमा करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. Government Lottery
1 महिन्यात जास्तीत जास्त 25 बिले अपलोड करता येतील. मेरा बिल मेरा अधिकार योजनेबद्दल माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, या योजनेअंतर्गत एक व्यक्ती एका महिन्यात जास्तीत जास्त २५ बिल अपलोड करू शकते. प्रत्येक बिलाचे किमान मूल्य 200 रुपये असावे. 200 रुपयांपेक्षा कमी बिल अपलोड केल्यास स्वीकारले जाणार नाही.
मेरा बिल मेरा अधिकार योजनेचे मुख्य मुद्दे
मेरा बिल मेरा अधिकार योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना GST अंतर्गत खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल जमा करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
ही योजना लागू झाल्यानंतर बहुतांश व्यापारी जीएसटीचे पालन करतील.
अधिकाधिक जीएसटी बिले निर्माण झाल्यास व्यावसायिक कर चोरी करू शकणार नाहीत.
मेरा बिल मेरा अधिकार अॅपद्वारे या योजनेत सहभागी होता येईल.
हे मोबाईल अॅप iOS आणि Android या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.
अॅपवर अपलोड केलेल्या बिलामध्ये व्यापाऱ्याचा जीएसटीआयएन क्रमांक, भरलेली रक्कम आणि कराची रक्कम स्पष्टपणे नमूद करावी.
या अॅपवर दुकानदाराकडून खरेदी केलेल्या वस्तूचे GST बिल अपलोड करून कोणताही नागरिक रोख बक्षीस जिंकू शकतो.
पात्रता-
मेरा बिल मेरा अधिकार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खरेदी केलेल्या वस्तूचे GST बिल असणे आवश्यक आहे.
अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
केवळ 200 रुपयांच्या वरची बिलेच अपलोड करता येतील.
आवश्यक कागदपत्रे-
आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
वस्तूंचे जीएसटी बिल
मोबाईल नंबर
खाते क्रमांक
ई – मेल आयडी
अर्ज कसा करायचा?
मेरा बिल मेरा अधिकार योजना 2023 अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, उमेदवाराला मेरा बिल मेरा अधिकार अॅप डाउनलोड करून अर्ज करावा लागेल.
यानंतर जीएसटी बिले अपलोड करून योजनेचा लाभ घेता येईल. मेरा बिल मेरा अधिकार योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे. याचा अवलंब करून तुम्ही सहज अर्ज करू शकता.
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये मेरा बिल मेरा अधिकार अॅप टाइप करावे लागेल आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्या समोर अॅप ओपन होईल.
यानंतर तुम्हाला इन्स्टॉल ऑप्शनवर क्लिक करून अॅप डाउनलोड करावे लागेल.
अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला ते उघडावे लागेल आणि तुमची काही माहिती जसे की तुमचे नाव, मोबाइल नंबर, आधार कार्ड क्रमांक, वय, लिंग, बँक खाते तपशील इ.
यानंतर तुम्हाला खरेदी केलेल्या वस्तूचे GST बिल अॅपवर अपलोड करावे लागेल.
अपलोड केलेल्या बिलामध्ये व्यापाऱ्याचा GSTIN क्रमांक, भरलेली रक्कम आणि कराची रक्कम स्पष्टपणे नमूद केलेली असावी.
जर तुमचे नाव लकी ड्रॉमध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला संदेशाद्वारे कळवले जाईल.
अशा प्रकारे तुमची मेरा बिल मेरा अधिकार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.