Sunday, September 8, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात लाच प्रकरणी तलाठी व महसूल सहायक जाळ्यात

कोल्हापुरात लाच प्रकरणी तलाठी व महसूल सहायक जाळ्यात

एसीबीची जयसिंगपुरात कारवाई : २७,५०० रुपयांची मागणी(revenue management services). प्लॉटच्या क्षेत्रफळात झालेली तफावत दूर करून देण्यासाठी २७ हजार ५०० रुपयांची लाच मागणारा जयसिंगपूर येथील तलाठी स्वप्निल वसंतराव घाटगे (वय ३९, रा. रुकडी, ता. हातकणंगले) व महसूल सहायक क्लार्क शिवाजी नागनाथ इटलवार (वय ३२, रा. कसबा बावडा, मुळ नांदेड) या दोघांवर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री अटक करण्यात आली.

 

तक्रारदार यांचा जयसिंगपुरातील डवरी वसाहत येथे प्लॉट आहे(revenue management services). त्याच्या क्षेत्रफळात तफावत असल्यामुळे ती दुरुस्त करून नवीन सातबारा द्यावा, असा अर्ज तक्रारदार यांनी जयसिंगपूर तलाठी कार्यालयात केला होता. हे काम तलाठी स्वप्निल घाटगे यांच्याकडे आले होते. हे काम करून देण्यासाठी शिरोळ तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक क्लार्क शिवाजी इटलवार व खासगी टायपिस्ट यांच्यासाठी २७ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सोमवार दि. २६ रोजी जयसिंगपूर येथे जाऊन खात्री केली. तेव्हा तलाठी व महसूल सहायक हे दोघे २७,५०० रुपयांची लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या दोघांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सरदार नाळे, पो. नि. आसमा मुल्ला, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, विकास माने, सुधीर पाटील, सचिन पाटील, संदीप पवार, सूरज अपराध, विष्णू गुरव यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -