Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र2 लाख जमा करा आणि 90 हजार रुपये व्याज मिळवा : पोस्टाची...

2 लाख जमा करा आणि 90 हजार रुपये व्याज मिळवा : पोस्टाची योजना : Post Scheme

प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये कष्टाने पैसे कमवतात आणि या कमावलेल्या पैशांची बचत करून भविष्यकालीन आर्थिक दृष्टिकोनातून त्या पैशांची गुंतवणूक करत असतात. साहजिकच प्रत्येकजण जेव्हा गुंतवणुकीचा पर्याय शोधतात तेव्हा त्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा व केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून विचार करूनच गुंतवणूक करतात.याकरिता बहुसंख्य व्यक्ती हे बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मुदत ठेव योजनांचा पर्याय निवडताना आपल्याला दिसतात. कारण बँकांमधील पैसा हा सुरक्षित राहतो आणि परतावा देखील चांगला मिळतो.

याव्यतिरिक्त सरकारच्या अनेक गुंतवणूक योजनांचा देखील बरेच व्यक्ती लाभ घेतात. तसेच पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक गुंतवणूक योजना असून गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिसच्या योजना देखील खूप फायद्याच्या आहेत.

पोस्ट ऑफिसच्या अनेक गुंतवणूक योजना आहेत व त्यातीलच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना होय.ही योजना देखील गुंतवणुकीसाठी खूप फायद्याची असून या योजनेत गुंतवणूक केल्यावर चांगल्या व्याजाचा फायदा गुंतवणूकदारांना मिळवता येणे शक्य आहे. त्यामुळे या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या या योजनेची माहिती बघणार आहोत.

पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना आहे फायद्याची :

पोस्ट ऑफिसच्या ज्या काही गुंतवणूक योजना आहेत त्यामध्ये पोस्ट ऑफिसची नागरिकांसाठी असलेली टाईम डिपॉझिट योजना खूप महत्त्वपूर्ण असून या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही जवळपास 90 हजार रुपयांचे व्याज मिळवू शकतात.

ही योजना सरकारच्या माध्यमातून राबवली जाते व या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीवर 6.9% ते 7.5% पर्यंत व्याजदर मिळतो. समजा या योजनेमध्ये तुम्ही दोन लाख रुपये जमा केले तर पाच वर्षानंतर 90 हजार रुपयांचे व्याज या माध्यमातून तुम्हाला मिळते.

जर आपण काही मीडिया रिपोर्टचा अहवाल पाहिला तर त्यानुसार पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट खाते तुम्ही चार वेगवेगळ्या कालावधीसाठी उघडू शकतात. या योजनेमध्ये एक वर्षाच्या गुंतवणुकीवर 6.9%, दोन वर्षाकरिता सात टक्के तर तीन वर्षाकरिता 7.1% इतके व्याजदर दिला जातो.

तसेच पाच वर्षांसाठी 7.5% व्याजदर मिळतो. या टाईम डिपॉझिट योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी एक हजार रुपये गुंतवू शकतात. समजा तुम्ही जर पोस्ट ऑफिसच्या या टाईम डिपॉझिट योजनेमध्ये पाच वर्षाकरिता दोन लाख रुपये गुंतवणूक केले तर तुम्हाला या पाच वर्षाच्या कालावधीत दोन लाख रुपयांवर 89990 रुपये व्याजाचा लाभ मिळतो.

म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला तुमची गुंतवणूक केलेली रक्कम व त्यावर मिळणारे व्याज मिळते. एवढेच नाही तर या योजनेमध्ये पाच वर्षासाठी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कर सवलत देखील मिळते.

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायद्यानुसार 80C अंतर्गत गुंतवणुकीवर कर सूट देण्यात येते. या योजनेमध्ये तुम्हाला खाते उघडायचे असेल तर तुम्ही वैयक्तिक तसेच संयुक्त खाते देखील उघडू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -