Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : महिलेवर अत्याचार; दाखविले लग्नाचे अमिष

इचलकरंजी : महिलेवर अत्याचार; दाखविले लग्नाचे अमिष

इचलकरंजीतील एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना नुकताच समोर आली आहे. या घटनेमध्ये या पिढीतेची व संशयित आरोपीची इन्स्टाग्रामवरुन ओळख झाली होती.

इन्स्टाग्रामवरुन मैत्री झालेल्या महिलेला लग्नाचे वचन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी युवराज आबा गोसावी (रा. वारणा कोडोली) याच्यावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी येथील पिडीत महिला आणि वारणाकोडोली येथील युवराज गोसावी यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून युवराज गोसावी याने पिडीतेला लग्नाचे वचन देत ऑगस्ट २०२३ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पन्हाळा, जयसिंगपूर येथे लॉजवर तसेच फिर्यादीच्या घरात शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला.

त्यानंतर मी लग्न करणार नाही, तुझा माझा काही संबंध नाही असे म्हणत पिडीतेला शिवीगाळसह जीवे मारायाची धमकी दिली. या प्रकरणी पिडीतेने युवराज गोसावी याच्या विरुध्द पोलिसात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -