Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केली ‘गोदाम योजना’; पहा काय होणार लाभ?

सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केली ‘गोदाम योजना’; पहा काय होणार लाभ?

आपल्या देशात धनधान्याची सोनेरी बरसात कायम होत असते. कारण या देशात अन्नदाता शेतकऱ्याच्या कष्टाची प्रत्येकाला जाणीव आहे. आजचा शेतकरी हा प्रगत असून त्याला सहाय्यक ठरतील अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. मोदी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करून शेतकऱ्यांना आवश्यक ते पाठबळ देण्यास सक्षम आहे. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ‘गोदाम योजना’ सुरु केली आहे.

जिचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ११ राज्यांमधील प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) मध्ये धान्यांची साठवण करण्यासाठी एकूण ११ गोदामांचे उद्घाटन केले आहे. ही गोदामे धान्यसाठा करण्यासाठी विशेष पद्धतीने तयार करण्यात आली आहेत. ही गोदामे सरकारच्या माध्यमातील सहकार क्षेत्रात बनवलेली जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेचा भाग आहेत.

संबंधित PACS ला सबसिडी आणि व्याज सवलत मिळण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी आणि कृषी विपणन पायाभूत सुविधा यांसारख्या विद्यमान योजनांद्वारे हा उपक्रम राबविला जात आहे. (Grain Storage Scheme) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ही गोदाम योजना राबवली आहे. सरकारने देशभरात अतिरिक्त 500 PACS ची पायाभरणीदेखील केली आहे. तसेच यावेळी मोदींनी देशभरातील 18,000 PACS च्या संगणकीकरणाच्या प्रकल्पाचेदेखील उद्घाटन केले आहे.

काय म्हणाले PM नरेंद्र मोदी?

एका मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सहकार क्षेत्र अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी तसेच ग्रामीण विभागाच्या विकासाला गती देण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. (Grain Storage Scheme) तसेच नाबार्ड आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या सहकार्याने PACS गोदामांना अन्न पुरवठा साखळीशी जोडणे, हा या उपक्रमांचा मूळ आणि मुख्य उद्देश आहे.पुढे म्हणाले, ‘आज आम्ही आमच्या देशातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण जगातील सर्वात मोठी धन्य साठवण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशात हजारो गोदामे बांधली जाणार आहेत.

(Grain Storage Scheme) तसेच येत्या ५ वर्षांत सहकार क्षेत्रात बांधली जाणारी हजारो गोदामे साधारणपणे ७०० लाख टन साठवण क्षमता निर्माण करतील. अशाप्रकारे आम्ही जगातील सर्वात मोठी साठवण योजना सुरू केली आहे.आता ११ राज्यांमध्ये ११ पॅकद्वारे उभारलेल्या ११ गोदामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत देशभरात अजून हजारो गोदामे बांधली जाणार आहेत’. दरम्यान, ‘खाद्यतेल आणि खतांसह कृषी उत्पादनांसाठी आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी आपण सहकारी क्षेत्राला मदत करावे’, असे आवाहनदेखील मोदींनी केले. (Grain Storage Scheme)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -