Sunday, December 22, 2024
Homeक्रीडासाराला कन्यारत्न, ‘हा’ खेळाडू लग्न न करताच झाला बाप

साराला कन्यारत्न, ‘हा’ खेळाडू लग्न न करताच झाला बाप

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली याच्यानंतर आणखी एक क्रिकेटर बाप झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा क्रिकेटर लग्न न करताच बाप झालाय. साराने मुलीला जन्म दिलाय.क्रिकेट विश्वात नव्या पाहुण्यांचं आगमन सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली याला अपत्यप्राप्ती झाली. विराटची पत्नी अनुष्का शर्मा हीने मुलाला जन्म दिला.

विराट-अनु्ष्का या दोघांनी 15 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या आपल्या दुसऱ्या अपत्याचं नाव अकाय असं ठेवलं.त्यानंतर आता आणखी एक क्रिकेटर बाप झाला आहे. धक्कादायक बाप म्हणजे या क्रिकेटरची लग्न न करताच बाप होण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.साराने मुलीला जन्म दिला आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियमसन आणि त्याची पत्नी सारा रहीम या दोघांना तिसरं अपत्य झालं आहे.

केन विलियमसन याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला मुलगी झाल्याचं सांगितलंय. केनने या पोस्टमध्ये सारासोबतचा फोटो पोस्ट केलाय. सारा आणि केन हे दोघे विवाहीत नाहीत. मात्र दोघ 9 वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत.घरी लवकरच कुणी तरी येणार असल्यानेच केनने विराटप्रमाणे पॅटरनिटी लिव्ह घेतली होती. त्यामुळे केन ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सहभागी झाला नव्हता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -