ताजी बातमी ऑनलाइन टीम
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. सध्या तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळत आहे. धोनी क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या पाश्वभूमीवर अखेरचा सामना कधी आणि कुठे असावा याबद्दल खुद्द माहीने सांगितलं आहे. चेन्नईमध्ये बोलत असताना अखेरचा सामना चेन्नई शहरातच खेळण्याची इच्छा आहे, असं धोनीने म्हटलंय. तसेच क्रिकेटला अलविदा कधी करणार याबाबतदेखील त्याने अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय.
शेवटचा सामना चेन्नई येथे खेळण्याची इच्छा
“मी क्रिकेटचे सर्व सामने नियोजन लावूनच खेळले. मी माझा शेवटचा एकदिवसीय क्रिकेटचा सामना रांची येथे खेळला. तर माझा अखेरचा टी-20 साना चेन्नई येथे व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझा अखेरचा सामना पुढच्या वर्षी असेल किंवा पुढच्या पाच वर्षात कधीही असेल, या संदर्भात मला माहिती. पण तो चेन्नई येथेच खेळला जाईल अशी मला आशा आहे,” असे धोनी म्हणाला.
महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -