Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूरमध्ये TET परीक्षा केंद्रावर गोंधळ

कोल्हापूरमध्ये TET परीक्षा केंद्रावर गोंधळ

ताजी बातमी /ऑनलाइन टीम

कोल्हापुरातील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्राबाहेर काही महिला परीक्षार्थींनी हंबरडा फोडला मात्र, केंद्रप्रमुखांनी गेट बंद केल्यामुळे गोंधळ झाला आहे. दोन वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षा रखडल्या होत्या त्या आज कोल्हापूरमध्ये पार पडत आहे. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठी गर्दी केली आहे.   मात्र, एसटीच्या संपाच्या वेळी महाराष्ट्र परीक्षा परिषदेनं संवेदनशीलता दाखवायला हवी होती, असं मत परीक्षार्थींनी मांडलं. नेहरु हायस्कूल केंद्रावर हा प्रकार घडला. तर, दुसरीकडे धुळे जिल्ह्यात खासदार सुभाष भांबरे यांच्या प्रयत्नानं विद्यार्थ्यांना 20 मिनिटांनंतरही प्रवेश मिळाला.

शिक्षक पात्रता परीक्षा आज संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने धुळ्यातही बऱ्याच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे. त्यात वेळेआधी पोहोचूनही काही परीक्षार्थींना परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आतमध्ये घेण्यास नकार दिल्याने परीक्षार्थींनी धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांच्याकडे धाव घेतली. खासदार भामरे यांनी परीक्षार्थींची समस्या लक्षात घेत परीक्षार्थी सोबत परीक्षा केंद्र गाठले. परीक्षार्थींना परीक्षा केंद्र प्रवेश मिळावा यासाठी खासदार भांबरे यांनी प्रयत्न केले. वीस मिनिटानंतर चा अथक प्रयत्नानंतर खासदार भामरे यांच्यामुळे परीक्षार्थींना आत प्रवेश मिळाला. त्यामुळे परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले तसेच भामरे यांचेही आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -