Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रशैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू : दहा ते वीस लाखापर्यंत चे कर्ज...

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू : दहा ते वीस लाखापर्यंत चे कर्ज (education loan)

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो बरेच विद्यार्थी माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी धडपड करत असतात. कुणाच्या घराची परिस्थिती अनुकूल असते. तर कुणाच्या घरची परिस्थिती अनुकूल नसते. यासोबतच आणखीन काही बऱ्याच अडचणी असू शकतात. त्यामुळे आपल्याला हव्या त्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे हव्या त्या क्षेत्रात शिक्षण घेताना आल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे नुकसान होते. (Education loan)

 

इच्छा असूनही शिकण्याची त्यांना शिकता येत नाही. परिस्थितीचा विचार करत आपल्या परिस्थितीला पेलेल, जमेल असेच शिक्षण ते विद्यार्थी पूर्ण करतात. परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान देखील होते त्यामुळे परंपरागत चालत आलेले शिक्षण शिकून मिळेल ती नोकरी करणे आणि त्यात समाधान मानणे असे प्रवृत्ती विद्यार्थी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.

 

शिक्षणासाठी कर्ज काढावे म्हटले तर ज्या वित्तीय संस्था किंवा बँका कर्ज देणार आहेत त्यांचे नियम अठी देखील खूप असतात. तसेच कागदपत्राची पूर्तता देखील नसते, त्यामुळे ते कर्ज काढू शकत नाहीत. पैसा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण होत नाही. विद्यार्थी हुशार होतकरू असला तरी पैशाअभावी त्याला शिक्षण घेता येत नाही. तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतो. त्यामुळेच मित्रांनो अशा हुशार विद्यार्थ्यांची नुकसान होऊ नये म्हणून आणि सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नयेत.( Education loan)

 

यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने एक योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ सर्व विद्यार्थी वर्ग करू शकतात. याचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी पात्र असणार आहे. पैशा अभावी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी महाराष्ट्राने शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली आहे.

 

या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पाल्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही योजना खूप उपयोगी आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना याचा फायदा जास्त प्रमाणात होणार आहे. चर्मकार समाजाला या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेचे नाव शैक्षणिक कर्ज योजना असून ही महाराष्ट्रातील समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दहा ते वीस लाखापर्यंत चे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याला ऑफलाइन अर्ज भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर त्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. जेणेकरून त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 

आणि अनुसूचित जातीतील व्यक्तींचा यामुळे समाजातील जीवनमान उंचावणार आहे. यामध्ये चर्मकार, ढोर, कोल्हार, मोची यासारख्या अनुसूचित जातींचा समावेश करण्यात आलेला आहे. चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे. या समाजाला आर्थिक सहाय्य करून त्यांचे भविष्य उज्वल बनवणे त्यांची आत्म शक्ती वाढवून स्वावलंबी जीवन जगण्याची हिंमत यामुळे मिळणार आहे.( Education loan)

त्यांना आत्मनिर्भर बनवून त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे उद्दिष्ट मुख्य आहे. त्यामुळे या कर्जासाठी केवळ चार टक्के व्याजदर आकारला जातो. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तो चर्मकार समाजातील असावा आणि त्या व्यक्तीचे वय किमान 18 ते 50 पर्यंत असावे.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यास त्यांच्या जिल्ह्याच्या कार्यालयात जाऊन समाज कल्याण व शैक्षणिक विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यायचा आहे. आणि त्या अर्जामध्ये जी काही माहिती विचारलेली आहे. ती सर्व माहिती खरी भरायचे आहे.

हा अर्ज ऑफलाइन असल्यामुळे स्वतःलाच हा अर्ज भरायचा आहे. आणि अर्ज भरून झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडायची आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आणि अर्ज भरल्यानंतर तो अर्ज आपल्याला समाज कल्याण व शैक्षणिक विभाग यांच्याकडे जमा करायचा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -