Monday, February 26, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात हनीट्रॅपचा धडाका, अल्पवयीन मुलीने तरुण कापड व्यापाऱ्याला अडीच लाखाला लुटले

कोल्हापुरात हनीट्रॅपचा धडाका, अल्पवयीन मुलीने तरुण कापड व्यापाऱ्याला अडीच लाखाला लुटले

हनीट्रॅपमध्ये  अडकवून तरुणाला अडीच लाख रुपयाला गंडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.२१) रविवारी कोल्हापुरात उघडकीला आला आहे. दरम्यान हा तरुण कापड व्यापारी आहे. युवतीसह टोळीच्या दहशतीला घाबरून तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने व्यापाराने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.मात्र नातेवाईक आणि पोलीसांच्या सर्तकेतेेमुळे तरूणाचा जीव वाचला आहे.

हनी ट्रॅप  टोळीचा म्होरक्या सागर माने हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून फसवणूकीचे प्रकार झाले असल्यास संबंधितांनी थेट पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषनचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी केलेे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -