आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी (samsung) सॅमसंगने आपल्या Galaxy F सीरीजमध्ये वाढ करत नवीन Samsung Galaxy F15 5G भारतात लॉन्च केला आहे. आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने आपल्या Galaxy F सीरीजमध्ये वाढ करत नवीन Samsung Galaxy F15 5G भारतात लॉन्च केला आहे. यात 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 6000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जर सपोर्ट ग्राहकांना मिळणार आहे.
Samsung Galaxy F15 5G 12,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 4GB + 128GB इंटरनल स्टोरेज असेल. याशिवाय 6GB + 128GB स्टोरेज 14999 रुपयांना मिळेल. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर उपलब्ध असलेल्या दोन्ही प्रकारांवर 1,000 ची सूट ग्राहकांना मिळणार आहे. यानंतर याची किंमत 11,999 रुपये होईल.
सॅमसंगचा (samsung) हा नवीन फोन फ्लिपकार्ट, सॅमसंग स्टोअर आणि इतर ऑफलाइन स्टोअरमधून ग्राहक खरेदी करू शकतात. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून याची विक्री सुरु होणार आहे. कंपनी सॅमसंग 25W फास्ट चार्जिंग ॲडॉप्टर 299 रुपयांना देत आहे. ज्याची किंमत 1299 रुपये आहे.
या नवीन फोनमध्ये कंपनी 2340×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देत आहे. हा फुल एचडी + डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये MediaTek Dimension 6100 Plus चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे.
यामध्ये 50-मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा, 5-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा मिळेल. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आलीआहे. ही बॅटरी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 14 वर आधारित OneUI 6.0 वर काम करतो. कंपनी या फोनला 4 जनरेशन अँड्रॉइड अपडेट्स आणि 5 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स देईल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, वाय-फाय आणि 3.5 मिमी जॅक सारखे पर्याय असतील.