Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रआचारसंहिता १४ किंवा १५ मार्च पासून लागू होणार? लोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये होणार?

आचारसंहिता १४ किंवा १५ मार्च पासून लागू होणार? लोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये होणार?

लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या तारखा समोर आले असून या महिन्यापासून आचारसंहिता व पुढील महिन्यात निवडणुका होणार असल्याचे संकेत स्पष्ट होऊ लागली आहे.

 

लोकसभा निवडणुकीकडं आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून केव्हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होतो याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच आता ही घोषणा १३ किंवा १४ मार्च रोजी होईल, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

 

मार्चच्या मध्यात अर्थात १३ किंवा १५ मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यास त्यानंतर साधारण महिन्याभरानं प्रत्यक्ष निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण आचार संहिता निवडणुकी घोषणा झाल्या झाल्याच म्हणजेच १४ किंवा १५ मार्च रोजी लागू शकते.

 

दरम्यान, यंदाची लोकसभा निवडणूक २०१९ प्रमाणेच ७ टप्प्यात होईल, तर पहिल्या टप्प्यातील मतदान हे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, असंही माध्यमानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -