Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंगBitcoin ने तोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड! गुंतवणूकदार असे झाले मालामाल

Bitcoin ने तोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड! गुंतवणूकदार असे झाले मालामाल

जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीने 28 महिन्यानंतर रेकॉर्ड मोडीत काढला. बिटकॉईनने जागतिक बाजारात 69 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला. या वर्षात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना जवळपास 60 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, बिटकॉईनच्या या तेजीमागे दोन प्रमुख कारणं आहेत. अमेरिकेत क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये गुंतवणूकदार सातत्याने गुंतवणूक करत आहेत. तर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपातीचे संकेत मिळत आहे. त्याचा परिणाम या सर्वकालीन घौडदौडीत दिसून येत आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये 68,991 डॉलरसह बिटकॉईन सर्वकालीन उच्चांकावर पोहचले होते. हा विक्रम आता मोडीत निघाला. गेल्या वर्षभरात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा दिला.

सर्वकालीन उच्चाकांवर बिटकॉईन

मंगळवारी जागतिक बाजारात बिटकॉईनचा भाव 28 महिन्यांच्या विक्रमी स्तरावर पोहचला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये बिटकॉईनच्या नावावर 68,991 डॉलरचा विक्रम आहे. हा रेकॉर्ड इतिहासजमा झाला. व्यापारी सत्रात बिटकॉईन 69,208.79 डॉलरच्या पण पुढे गेले. विशेष म्हणजे या 28 महिन्यात बिटकॉईन 20 हजार डॉलरहून निच्चांकावर पोहचले होते. व्याजदर वाढल्याने हा फरक दिसून आला. बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सीत पण घसरण दिसून आली.

कारण तरी काय?

अमेरिकेत क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये बिटकॉईनची मागणी वाढली आहे. पुरवठा कमी असल्याने किंमतीत वाढ झाली. तर अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने येत्या काही महिन्यात व्याजदरात कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे डॉलर इंडेक्स घसरला आहे. परिणामी बिटकॉईनची किंमत वधारली आहे. अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने 11 स्पॉट बिटकॉईन ईटीएफला मंजुरी दिल्यानंतर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवली आहे.

एक वर्षात 200 टक्क्यांचा परतावा

ऑक्टोबरनंतर बिटकॉईनमध्ये जवळपास 160 टक्क्यांची वाढ दिसून आली. 44% वृद्धी एकट्या फेब्रुवारी महिन्यात दिसून आली. या वर्षात आतापर्यंत बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांच्या जवळपास रिटर्न दिला आहे. तर गेल्या एका आठवड्यात बिटकॉईनने 20 टक्के झेप घेतली. एका वर्षात बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांचा परतावा दिला. तर एका महिन्यात हा परतावा जवळपास 60 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. गुंतवणूकदार मालामाल झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -