Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रश्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! Elon Musk च्या संपत्तीत मोठी घसरण

श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! Elon Musk च्या संपत्तीत मोठी घसरण

जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मोठा उलटफेर दिसला. गेल्या 24 तासांत या सर्वात श्रीमंतांच्या संपत्तीत त्सुनामी आली. सर्वाधिक नुकसान टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या दिग्गज कंपन्यांचे सीईओ एलॉन मस्क यांना बसला. केवळ दोन दिवसांत एलॉन मस्क जगातील क्रमांक-1 वरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांची संपत्ती 48 तासांत 2 लाख कोटी रुपयांनी घसरली. तर जेफ बेजोस आणि बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली.

दोन दिवसांत मस्क यांनी गमावले 2 लाख कोटी

श्रीमंतांच्या यादीत दोन दिवसांपासून मोठा उलटफेर सुरु आहे. यामध्ये पहिल्या तीन क्रमांकात मोठा बदल दिसून आला. या यादीतील अनेक अब्जाधीशांना कोट्यवधींचा फटका बसला. टेस्लाच्या शेअरमधील मोठ्या घसरणीचा फटका सोमवारी एलॉन मस्क यांना फसला. टेस्लाचे शेअर 7 टक्क्यंनी घसरले. परिणामी मस्क यांची संपत्ती 1.46 लाख कोटी रुपयांनी घसरली. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला फटका बसल. पहिल्या क्रमांकावरुव ते दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मंगळवारी पुन्हा त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यांच्या संपत्तीत 44000 कोटींची घसरण दिसून आली.

बेजोस आणि अर्नाल्टने टाकले मागे

मस्क याच्या संपत्तीत त्सुनामी आली. संपत्तीत मोठी घट झाली. श्रीमंतांच्या यादीत मस्क तिसऱ्या क्रमांकावर आले. त्यांची एकूण संपत्ती 192 अब्ज डॉलर इतकी उरली आहे. एमेझॉनचे संस्थापक Jeff Bezos यांनी त्याला अगोदर मात दिली तर आता फ्रान्सचे अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्टने मस्कला आस्मान दाखवले. 2024 ची सुरुवात मस्कसाठी फायदेशीर ठरली नाही.

200 अब्ज डॉलरचा क्लब रिकामा

एलॉन मस्क गेल्या नऊ महिन्यांपासून जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत होते. ते दोन दिवसांत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. आता एमेझॉनचे मालक जेफ बेजोस हे 197 अब्ज डॉलरसह जगातील पहिले श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर 195 अब्ज डॉलरसह बर्नार्ड अर्नाल्ट हे या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. पण जगातील 10 सर्वात श्रीमंतांच्या यादीत एकाकडे पण 200 अब्ज डॉलर संपत्ती नव्हती.

अंबानी यांना नुकसान, अदानी यांना फायदा

भारतीय अब्जाधीशांपैकी रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांची नेटवर्थ घसरली आहे. त्यांची एकूण संपत्ती 535 दशलक्ष डॉलरने घसरुन ता 114 अब्ज डॉलरवर आली आहे. तर या यादीतील दुसरे भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांना फायदा झाला आहे. गेल्या 24 तासांत त्यांच्या संपत्तीत 341 दशलक्ष डॉलरची भर पडली आहे. त्यांची संपत्ती आता 104 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -