Sunday, December 22, 2024
Homeक्रीडातोच प्लेयर का? चांगलं खेळूनही रोहित शर्मा पाचव्या टेस्टमध्ये ‘या’ खेळाडूला बाहेर...

तोच प्लेयर का? चांगलं खेळूनही रोहित शर्मा पाचव्या टेस्टमध्ये ‘या’ खेळाडूला बाहेर बसवणार का?

इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे. या संपूर्ण सीरीजमध्ये एका खेळाडूने दमदार प्रदर्शन केलय. याआधी सुद्धा अनेकदा दमदार कामगिरी करुनही त्यालाच ड्रॉप करण्यात आलय. आता सुद्धा चांगल खेळून त्यालाच कदाचित बाहेर बसाव लागेल.धर्मशाळा टेस्टआधी रोहित शर्मा अशी एक गोष्ट बोलून गेला, ज्यामुळे भारतीय फॅन्सही चक्रावले आहेत.

धर्मशाळा येथे मीडियाशी बोलताना रोहित म्हणाला की, प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाजांना संधी देण्याचा विचार आहे. अजूनपर्यंत प्लेइंग इलेव्हन ठरलेली नाही. पण असं करण्याचा विचार आहे. धर्मशाळा कसोटीत तीन वेगवान गोलंदाज खेळणार म्हणजे टीम इंडिया दोन स्पिनर्ससह मैदानात उतरणार. अश्विन, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादवपैकी एकजण बाहेर बसणार. अश्विनच धर्मशाळा कसोटीत खेळणं निश्चित आहे. जाडेजाची फलंदाजी जमेची बाजू आहे, त्यामुळे त्याला ड्रॉप करण्याचा विचार होऊ शकत नाही.

आता उरला कुलदीप यादव. मग, रोहित शर्मा कुलदीप यादवला ड्रॉप करणार का?कुलदीप यादवने या टेस्ट सीरीजमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलय. राजकोट, रांचीमध्ये टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पण धर्मशाळा कसोटीत त्याला ड्रॉप करण्याची शक्यता जास्त आहे. रोहित शर्मा तीन वेगवान गोलंदाजांना का संधी देणार आहे?. धर्मशाळाच हवामान, तिथला पीच वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. मागच्या कसोटीत आराम करणाऱ्या जसप्रीत बुमराहच पाचव्या कसोटीत खेळण निश्चित आहे. सिराजला संधी मिळू शकते. आकाश दीपला सुद्धा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल. मग, आकाश दीपसाठी कुलदीपला ड्रॉप करणार का?

टीम इंडिया या प्लेयरला का बॅक करतेय?रोहित शर्माने प्रेस कॉन्फरन्समध्ये रजत पाटीदारच्या टीममध्ये खेळण्याचे संकेत दिले. इतक्या कमीवेळात रजत पाटीदारला संधी नाकारण योग्य ठरणार नाही. रजतमध्ये टॅलेंट असल्यामुळे टीम इंडिया या खेळाडूला बॅक करतेय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -