Monday, September 25, 2023
Homeकोल्हापूरकबनूर चौक बनतोय मृत्यूचा सापळा

कबनूर चौक बनतोय मृत्यूचा सापळा

ताजी बातमी ऑनलाइन टीम


कबनुर म्हणजे महाराष्ट्रचे मँचेस्टर इचलकरंजीचे प्रवेशद्वार कबनूरच्या रत्नाप्पा कुंभार चौकात आठ रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी हा नेहमीचा प्रश्न तयार झाला आहे. वेगावर नियंत्रण नसणे व प्रत्येकाच्या घाईगडबडमुळे ओव्हरटेक करून पुढे जाणे यामुळे मुख्य रोडवर आतापर्यंत सात ते आठ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

या प्रश्नाबाबत विविधस्तावर आवाज उठवल्यानंतरही अद्याप मार्ग निघाला नाही. याबाबत ग्रामपंचायत व वाहतूक शाखा नियंत्रक अधिकारी यांच्या सहकार्यातून मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सदर चौकाबाबत एकत्र बसून सुसंवादातून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यामध्ये कबनुरचे ग्रामदैवत जंदीसोब्रॉनसो दर्गा चौका लगतच आहे.

त्याठिकाणी प्रत्येक गुरुवारी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यावर उपाय म्हणून द्वार जाणारे प्रवेश द्वार उत्तर बाजूला आहे तो दरवाजा फक्त गुरुवार साठी ग्रामपंचायत ऑफिस समोरील बाजूस दर्गा करता मोठा दरवाजा आहे तो भक्तांना द्वार येण्यासाठी चालू ठेवावा. उद, साखरचे स्टॉल झेंडा चौकात एका बाजूस लावावेत व भक्तांना दर्शन घेऊन बाहेर पडण्यासाठी उत्तर दिशेने जवावेत.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र