Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाIndia vs New Zealand : न्यूझीलंडचा 3-0 ने धुव्वा

India vs New Zealand : न्यूझीलंडचा 3-0 ने धुव्वा

ताजी बातमी ऑनलाइन टीम

टी-20 विश्वचषकातील पराभवाचा काहीअंशी वचपा काढताना (India vs New Zealand) भारताने न्यूझीलंडला 3-0 असा क्लीन स्वीप दिला. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यांत भारताने न्यूझीलंडवर 73 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने पहिला टी-20 पाच विकेटस्ने आणि दुसरा सामना 7 विकेटस्ने जिंकला होता.

कर्णधार रोहित शर्माच्या 56 धावा आणि शेवटी दीपक चहरने (8 चेेंडूंत 21 धावा) केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने 20 षटकांत 7 बाद 184 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचे फलंदाज 17.2 षटकांत 111 धावांवर ढेपाळले. भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक 9 धावांत 3 बळी घेतले. तर, हर्षलला 2 बळी घेता आले. अक्षर पटेल याला ‘सामनावीर’ तर रोहित शर्माला ‘मालिकावीर’चा पुरस्कार देण्यात आला. व्यंकटेश अय्यरने या सामन्यात पहिल्यांदाच गोलंदाजी केली. अ‍ॅडम मिल्ने हा त्याचा पहिली शिकार ठरला.

भारताच्या 184 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ‘पॉवर प्ले’मध्येच तीन विकेटस् गमावल्या. अक्षर पटेलने किवींजना हे धक्के दिले. त्याने डॅरेल मिचेल (5), मार्क चॅपमन (0) आणि ग्लेन फिलिप्स (0) यांना बाद केले. हे तिघे बाद झाले तरी मार्टिन गुप्टिल मात्र अनस्टॉपेबल होता. त्याने 33 चेेंडूंत अर्धशतक गाठले; पण तो त्यात एका धावेची भर घालून बाद झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -