Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रपाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेचं ठरलं! २ एप्रिलपासून परीक्ष

पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेचं ठरलं! २ एप्रिलपासून परीक्ष

१४ वर्षांनी ‘आरटीई’ नियमात पुन्हा बदल करून पाचवी व आठवीच्या वर्गातील (examination) विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठविण्याचा प्रकार कायमचा बंद होणार आहे. या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा २ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना यंदा वार्षिक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे, अन्यथा त्यांना पुढच्या वर्गात जाताच येणार नाही.

१४ वर्षांनी ‘आरटीई’ नियमात पुन्हा बदल करून पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठविण्याचा प्रकार कायमचा बंद होणार आहे. या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची (examination) परीक्षा २ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. ‘आरटीई’ धोरणानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याची पद्धत २०१० पासून सुरू झाली होती. त्यावेळी या ढकलपास पद्धतीला अनेकांनी विरोध केला, तरीपण ही पद्धत राज्यभर लागू झाली. सरसकट पास करण्याच्या पद्धतीमुळे इयत्ता दहावीतून शाळा सोडणाऱ्यांची आणि बारावीपर्यंतच शिक्षण घेणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढली.

पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना किमान इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय व्यवस्थित समजायला हवे आणि त्याचे पारदर्शक मूल्यमापन होणे जरूरी आहे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण फार कठीण जाणार नाही असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार असून त्यात त्या विद्यार्थ्यांना पास व्हावेच लागणार आहे. ‘आयटीआय’चे अनेक कोर्स इयत्ता आठवीवरूनच असून त्याठिकाणी हुशार मुलांना संधी मिळणार आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

 

पाचवीचे विद्यार्थी

७१,४५१

आठवीचे विद्यार्थी

७०,५०३

एकूण

१,४१,९५४

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एसईआरटी) पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक (examination) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका नमुना स्वरुपात तयार करण्यात आल्या आहेत. त्या धर्तीवर सर्व आस्थापनांच्या शाळांनी आपल्याकडील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार असल्याने शाळांनी त्यादृष्टीने तयार करण्याच्या सूचनाही ‘एसईआरटी’ने दिल्या आहेत. शाळा स्तरावर जिल्हा परिषदेसह खासगी माध्यमिक, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायिता, अंशत: अनुदानित अशा सर्वच आस्थापनाच्या शाळांमधील पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना आता वार्षिक परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे.

या परीक्षेत नापास झालेल्यांना पुन्हा एकदा एका महिन्याने संधी दिली जाणार असून ही परीक्षा मे महिन्यात पार पडेल. त्यावेळी उत्तीर्ण झालेल्यांना जूनपासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पुढच्या वर्गात प्रवेश मिळेल, अन्यथा नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होईपर्यंत त्याच वर्गात बसावे लागणार आहे. इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा होणार असून दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. तसेच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलमध्येच होईल.

मल्हारी बनसोडे, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -