काही दिवसांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांआधी लक्षद्विपला भेट दिली होती. या घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर आता मोदींनी आणखी एका विशेष ठिकाणाला भेट दिली आहे.
लोकसभा निवणडूक अवघ्या काही दिवसांवर आहे. कोणत्याही दिवशी आचरसंहिता लागू शकते. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. आज ते आसाममध्ये आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तिथे त्यांनी जंगलसफारीचा आनंद लुटला. तसंच पंतप्रधान मोदी यांनी हत्तीवर बसून जंगल सफारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओपन जीपमधून जंगलसफारीचा आनंद लुटला. यावेळी जंगलातील प्राण्यांविषयी माहिती घेतली. नव्यप्राण्यांचं जीवन कसं असतं? याविषयी त्यांनी जाणून घेतलं.
आसाममधील चहाच्या मळ्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. चहाचा मळा कसा पिकवला जातो? त्याची निगा कशी राखली जाते? याबाबत पंतप्रधानांनी माहिती घेतली.