बॉलिवूडमधील अभिनेत्रींचं सर्वांनाच आकर्षण असतं. पडद्यावरील सौंदर्यवतींचं खऱं आयुष्यही तितंकच सुंदर असतं असं प्रत्येकाला वाटतं. पण ते काही खरं नाही. अशा कितीतरी अभिनेत्री आहेत, ज्यांनी मोठा पडदा गाजवला, आपल्या सौंदर्याने, अभिनयाने लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य केलं. पण खऱ्या आयुष्यातं सगळं काही मनासारखं झालं नाही, उलट पर्सनल लाइफमध्ये त्यांना बऱ्याच कठीण परस्थितीचा सामना करावा लागला. अशीच एक अभिनेत्री म्हणजे 90 च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी, करिश्मा कपूर…
कपूर खानदानात जन्मलेल्या अभिनेत्रीला प्रोफेशमल आयुष्यात यश तर खूप मिळालं पण खऱ्या आयुष्यात प्रेमापासूत ती वंचितच राहिली. नामवंत अभिनेत्याशी ठरलेला साखरपुडा मोडला, लग्न केलं तरी त्यात सुख मिळालं नाहीच, उलट दु:ख, वेदना, अपमानच वाट्याला आले. एकेकाळी करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांची जोडी खूप चर्चेत होती. त्यांचा साखरपुडाही झाला होता, लवकरच ती बच्चन कुटुंबाची सून बनणार होती. पण अचानक माशी शिंकली आणि त्यांचा साखरपुडा तुटल्याच्या बातम्या समोर आल्याने एकच खळबळ माजली.
लग्नही ठरलं अयशस्वी
त्यानंतर 2003 साली करिश्मा कपूरने दिल्लीतील बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले, पण हे लग्न तिच्यासाठी त्रासदायकच ठरलं. खुद्द करिश्मा कपूरने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला होता की, लग्न झाल्यापासून संजय कपूर तिच्यासोबत खूप वाईट वागायचा. लग्नाच्या रात्रीही संजय कपूरने करिश्मा कपूरला त्याच्या मित्रांसोबत झोपण्याची जबरदस्ती केली होती.
करिश्माला केली मारहाण
एका मुलाखतीदरम्यान करिश्माने त्या कटू आठवणींबद्दल सांगितलं होतं. तिचा पती संजय कपूर याने तिला, त्याच्या मित्रांसोबत झोपण्यासाठी तिची किंमतही ठरवली होती. मात्र करिश्माने या गोष्टीस ठाम नकार दिला, तेव्हा संजयने तिला बेदम मारहाण केली होती. लग्नाच्या पहिल्या रात्रीच घडलेल्या या प्रकारामुळे करिश्मा अक्षरश: धाय मोकलून रडली होती.
सासूने मारली थप्पड, धक्काही दिला
करिश्मा कपूरने मुलाखतीत पुढे सांगितले की, फक्त तिचा पती संजय कपूरच नव्हे तर तिचे सासरचे लोकही तिचा खूप छळ करायचे. संजयच्या आईला म्हणजेच करिश्माच्या सासूला ती अजिबात आवडत नव्हता. तिने अनेकदा करिश्मासोबत वाईट वागायची. एवढंच नव्हे तर करिश्मा प्रेग्नंन्ट असतानाही तिच्या सासूचे वागणे बिलकूल चांगले नव्हते. तिच्या सासून तिला कानाखाली देखील मारली होती, ज्यामुळे तिला दुखापत झाली. त्यांची क्रूर वागणूक इथेच थांबली नाही, प्रेग्नन्सी दरम्यानच एकदा तिच्या सासूने करिश्माला धक्का ही मारला होता.
संजयचा भाऊ ठेवायचा करिश्मावर नजर
करिश्माचा पती संजय कपूर याने, त्याच्या भावाला करिश्मावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. याचदरम्यान, करिश्मा कपूरने एक मुलगी आणि एका मुलाला जनन्म दिला. दोन मुलं होऊनही करिश्मा आणि संजय कपूर यांच्या नात्यात काही सुधारणा झाली नाही.
करिश्माचा घटस्फोट
अखेर करिश्माचा पेशन्स संपला आणि तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र करिश्मा कपूरला घटस्फोट देणे संजय कपूरसाठी सोपे नव्हते. या तुटलेल्या नात्याची शिक्षा आजही संजय कपूर भोगत आहे. त्याला जबर किंमत मोजावी लागली. 2016 मध्ये करिश्माने पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला. यावेळी संजयने त्याच्या दोन्ही मुलांच्या नावे 14 कोटी रुपयांचे बॉन्ड्स खरेदी केले होते. याशिवाय संजयच्या वडिलांचे घरही करिश्माला देण्यात आले. इतकेच नाही तर संजय कपूर आजही करिश्मा कपूरला दर महिन्याला लाखो रुपयांचा भत्ताही देतो.