Tuesday, December 24, 2024
Homeक्रीडारोहित शर्मा होणार चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार! माजी क्रिकेटपटूने सांगितली ‘मन की...

रोहित शर्मा होणार चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार! माजी क्रिकेटपटूने सांगितली ‘मन की बात’

आयपीएल 2024 स्पर्धा यावेळी बऱ्याच कारणाने गाजणार आहे. खेळाडूंच्या उलथापालथीमुळे फ्रेंचायसीमध्ये बरीच रसमिसळ झाली आहे. त्यात मुंबई इंडियन्स संघाचं नाव आघाडीवर आहे. रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता पुढच्या पर्वात रोहित शर्मा दुसऱ्या फ्रेंचायसीकडून खेळणार या चर्चांना जोर आला आहे. त्याला माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूचं वक्तव्यही कारणीभूत ठरत आहे.आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. यावेळी लिलावात रोहित शर्माही असणार आहे.

त्यामुळे त्याला चेन्नई सुपर किंग्सने लिलावात घ्यावं अशी इच्छा अंबाती रायडून याने व्यक्त केली आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंबाती रायडू म्हणाला की, रोहित शर्मा आणखी पाच ते सहा वर्षे आयपीएल खेळू शकतो. त्यामुळे फ्रेंचायसींनी त्याच्यातील नेतृत्व गुण ओळखून पुढे जाण्याचा विचार केला तर नक्कीच त्याचं नाव आघाडीवर असेल. त्याला संघात घेण्यासाठी फ्रेंचायसी इच्छुक असतील.

रोहित शर्माने आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळावं, अशी इच्छा अंबाती रायडू याने बोलून दाखवली आहे. एमएस धोनी निवृत्त झाला तर चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व त्याच्याकडे सोपवलं जावू शकतं. त्यामुळे मी रोहित शर्माला सीएसकेचा कर्णधार होण्याची वाट पाहात आहे.मुंबई इंडियन्सचा यशस्वी असलेल्या कर्णधार असलेला रोहित शर्मा यावेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणार आहे. दुसरीकडे, 2025 लिलावात रोहित शर्मा दिसला तर चेन्नई सुपर किंग्स त्याला खरेदी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -