अंतराळात ग्रह-ताऱ्यांच्या अवस्था सतत बदलत असतात. त्यानुसार राशीभविष्यातही बदल होत असतो. आता लवकरच बुध या मोठ्या ग्रहाचा राशिबदल होत आहे. ज्योतिषशास्त्रातील बुध हा एक महत्त्वपूर्ण ग्रह आहे. बुध हा चंद्रानंतर सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार असेही म्हटले जाते.
बुध हा बुद्धिमत्ता, पैसा, व्यवसाय, संवाद, वाणी आणि करिअरचा कारक मानला जातो. बुधदेव २६ मार्चला मेष राशीत प्रवेश करणार आहे. काही राशी अशा आहेत ज्यांना बुधदेवाच्या राशी परिवर्तनाने चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. त्यांना आयुष्यात अपार सुख, समृध्दी आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे नशिब पालटणार?
सिंह राशी
या राशीच्या नवव्या भावात बुधदेव गोचर करणार आहेत, त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात या राशीच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते. मित्रांकडे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. घर, संपत्ती विकत घेण्याचा योग जुळून येऊ शकतो. नवे आर्थिक स्रोत या काळात खुले होऊ शकतात. या काळात सिंह राशीच्या उत्पन्नात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायातून मोठी कमाई होऊ शकते.धनु राशी
या राशीच्या पाचव्या भावात बुधदेवाचे गोचर करणार आहे. या काळात एखादे प्रलंबित सरकारी काम पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता. मालमत्तेच्या वादाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बुधाच्या राशी बदलामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
मकर राशी
या राशीच्या चतुर्थ भावात बुधदेव गोचर करणार आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळू शकतात. या काळात तुमचा मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरु शकतो. तुमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला वेळोवेळी मदत होऊ शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)