श्रेयस अय्यर याला अखेर सूर गवसला आहे. श्रेयस अय्यर फायनलमध्ये कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान याच्यानंतर अर्धशतक ठोकणारा तिसरा मुंबईकर फलंदाज ठरला आहे.टीम इंडियाचा सिनिअर मेन्स क्रिकेटर श्रेयस अय्यर याला अखेर सूर गवसला आहे. बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्यानंतर श्रेयसने रणजी ट्रॉफी सेमी फायनलमध्ये तामिळनाडू विरुद्ध अपयशी ठरला. त्यामुळे श्रेयस अय्यर याच्यावर सडकून टीका करण्यात आली.
मात्र श्रेयसला अखेर सूर गवसला आहे. श्रेयसने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भ विरुद्ध दमदार अर्धशतक ठोकत टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. श्रेयस रणजी ट्ऱॉफी फायनलमधील दुसऱ्या डावात मुंबईसाठी अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला. श्रेयसआधी कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान या दोघांनी अर्धशतकं केली. तर पहिल्या डावात शार्दूल ठाकुर याने अर्धशतकं ठोकलं.श्रेयस अय्यर याने हर्ष दुबे टाकत असलेल्या सामन्यातील 80 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर चौकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं.
श्रेयसने 62 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. श्रेयसच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील हे 30 वं अर्धशतक ठरलं. श्रेयसने या अर्धशतकासह त्याच्यावर सडकून टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं.श्रेयस अय्यरला गेल्या काही दिवसात अनेक चढ उतार पाहायला लागले. बीसीसीआयच्या सूचनेनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या खेळत नसलेल्या करारयुक्त खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायचे होते. मात्र श्रेयस अय्यर याने या सूचनकडे कानाडोळा केला. त्यामुळे अखेर श्रेयसवर बीसीसीआयने मोठी कारवाई केली. बीसीसीआयने श्रेयस अय्यर याच्यासह ईशान किशन या दोघांना वार्षिक करारातून वगळलं.
मात्र आता श्रेयसने 14 महिन्यांनी पुन्हा एकदा अर्धशतक ठोकत चाहत्यांची प्रतिक्षा संपवली.मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.