लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजपशी फिस्कटल्यानंतर हरियाणात मोठ्या राजकीय(cabinet) घडामोडी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळानेही राज्यपालांकडे राजीना दिल्याची बातमी आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हरियाणामध्ये आता भाजप स्वबळावर सरकार बनवण्याच्या तयारीत आहे.
मनोहर लाल खट्टर यांनी काही अपक्ष(cabinet) आमदारांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर राजभवनाकडे रवाना झाले. महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गाडीत गृहमंत्री अनिल विजही उपस्थित होते. यावेळी विज यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. भाजपच स्वबळावर सरकार बनवण्यात यशस्वी झालं तर विज हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या नव्या मुख्यमंत्रीपदाचा शपथ ग्रहण समारंभ आजच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजभवनात त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. सायंकाळा ५ पर्यंत शपथग्रहण समारोह पार पडण्याची शक्यता आहे.हरियाणाचे नवे मुख्यमंत्री दुपारी एक वाजता शपथ घेणार असून हा सोहळा राजभवनात पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि तरुण चुग हे निरीक्षक म्हणून चंदीगड विमानतळावर पोहोचले आहेत. या सर्वांचे विमानतळावर राज्यसभा खासदार सुभाष बराला यांनी स्वागत केलं. दरम्यान माजी शिक्षण मंत्री कंवरपाल गुर्जर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, सध्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हेच असतील. माजी कॅबिनेट मंत्री मूलचंद यांनीही मुख्यमंत्रीपदी मनोहर लाल खट्टर कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे.