बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मीरा चोप्राने नुकतीच लग्नबंधनात अडकली. बिझनेसमन रक्षित केजरीवालशी तिने लग्न केलंय. जयपूरमध्ये 12 मार्च रोजी धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला.मीरा आणि रक्षितच्या लग्नाला मोजके कुटुंबीय आणि पाहुणे उपस्थित होते. लग्नसोहळ्यात मीराने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. मीराने सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.आता आनंद, भांडणं, हास्य, अश्रू आणि आयुष्यभराच्या आठवणी तुझ्यासोबतच असतील.
प्रत्येक जन्म तुझ्यासोबतच असेन, असं कॅप्शन देत मीराने लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. मीरा आणि रक्षितचं लग्न जयपूर-दिल्ली हायवेवर असलेल्या ब्युना विस्टा लक्झरी गार्डन स्पा रिसॉर्टमध्ये पार पडलं.मीराने ‘सेक्शन 375’ आणि ‘सफेद’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘सफेद’मध्ये तिने बरखा बिष्ट, छाया कदम आणि जमील खान यांच्यासोबत काम केलंय.
हा चित्रपट 29 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये आणि त्यानंतर झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.मीराने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. तिने तमिळ, तेलुगू या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अधिक काम केलंय. मध्यंतरीच्या काळात मीराने कामातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ‘सफेद’ चित्रपटातून तिने कमबॅक केलं.