Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, कोणत्या जिल्ह्यांत कधीपासून पडणार अवकाळी पाऊस वाचा

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, कोणत्या जिल्ह्यांत कधीपासून पडणार अवकाळी पाऊस वाचा

वामान विभागाने तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यात अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. 16 ते19 मार्च या तीन दिवसांत या भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.राज्यात कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे.

हिवाळा गेल्यानंतर आता उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वैशाख वणव्याच्या झळा बसायला झाली आहे. त्यातच पहाटेच्या व रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट होत आहे. दुपारी मात्र तापमान वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात चढ उतार सुरु आहे. या वातावरणात चिंता निर्माण करणारी बातमी आली आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 16 ते19 मार्च दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहणार आहे.

मागील महिन्यात गारपीट अन् अवकाळी

मागील महिन्यात विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर मार्च महिना सुरु होताच तापमान वाढू लागले आहे. राज्यात बदलणाऱ्या वातावरणामुळे थंडी तापच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. हवामान विभागाने तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यात अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. 16 ते19 मार्च या तीन दिवसांत या भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.

नागपूरचे तापमान 38 अंश सेल्सियसवर

नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे. विदर्भात सर्वत्र उन्हाचे चटके सोसावे लागत आहे. नागपूरचा विचार केला तर नागपूरचा तापमान 38 अंश सेल्सियसवर गेला आहे. तसेच विदर्भातील काही शहरात 39 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे.

यामुळे घामाच्या धारा वाहायला सुरुवात झाली आहे. नागपूरकर आणि विदर्भवाशीयांना आता वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत असताना शेतकऱ्यांना पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.मागील महिन्यात झालेल्या पाऊस आणि गारपीटमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आता शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -