Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रआता विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही घालावा लागणार गणवेश, शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

आता विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही घालावा लागणार गणवेश, शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

नुकताच राज्यातील शालेय शिक्षण विभागाने एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शाळांच्या दृष्टीने हा एक मोठा बदल असणार आहे. राज्यातील सर्वात शाळेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे.

आतापर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गणवेश हा सत्तीचा होता. गणवेशाशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात नव्हता. परंतु आता हाच नियम शिक्षकांसाठी देखील लागू होणार आहे.

विद्यार्थ्यांना जसा गणवेश असतो, आता शिक्षकांना तसा ड्रेसकोड (Dress Code For Tearchers) लागू केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांना देखील ठरवलेल्या कपडे घालून शाळेत जावे लागणार आहे. असे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एकाच रंगाचा ड्रेस कोड सर्व शिक्षकांना वापरावा लागणार आहे. शिक्षकांनी शाळेत जीन्स, टी-शर्ट वापरू नयेत असे सूचना देखील शाळेत सरकारकडून देण्यात आलेला आहे.

ड्रेस कोड लागू झाल्यानंतर काय होईल | Dress Code For Tearchers

शाळांमध्ये ड्रेस कोड लागू केल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या मनाप्रमाणे कोणतेही कपडे घालता येणार नाही. त्याचप्रमाणे रंग कुठला याबाबत निर्णय शाळेने घ्यावा असे सांगितलेले आहे. त्यामुळे सरकारने नेमून दिलेले कपडे शिक्षकांना घालावे लागणार आहे. त्याचप्रमाणे या नियमात महिला शिक्षकांसाठी साडी अथवा सलवार कुर्ता असाच चेहरा असावा असे देखील त्यांनी सांगितलेले.

त्याचप्रमाणे पुरुष शिक्षकांनी शर्ट ट्राउजर पॅन्ट घालावी. शर्टचा रंग फिकट तर त्यांचा रंग डार्क असावा. त्याचप्रमाणे सर्व पुरुष शिक्षकांना खूप गरजेचे आहे. शिक्षकांनी शाळेत टी-शर्ट आणि जीन्स वापरू नये.

अशी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांनी शाळेत त्यांना कोणते बूट घालावेत. कशा चपला घालाव्यात याबाबत देखील त्यांनी नियम जाहीर केलेले आहेत.

त्यामुळे आता सरकारने दिलेल्या या निर्णयानुसार राज्यातील सर्व शिक्षकांना हा नियम पाळावा लागणार आहे. आणि त्याच सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे ड्रेस कोड घालावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -