Sunday, September 8, 2024
Homeअध्यात्मगुरु कोणाला करावे?गुरु करावे की नाही? गुरु केल्याने काय होते?

गुरु कोणाला करावे?गुरु करावे की नाही? गुरु केल्याने काय होते?

मित्रांनो, आपण अनेक वेळा ऐकले असेल गुरु करून घेतले जातात. तर गुरु हे करून घेतले जात नाही. आपण एका गुरुचे शिष्य होत असतात. परंतु आज काल असे म्हटले जाते की, गुरु करून घेतले जातात. आजच्या या लेखांमध्ये आपण या गुरु बद्दलच काही माहिती पाहणार आहोत. तिच्यामध्ये गुरु का करावे? गुरु केल्याने काय होते? गुरु करावे की नाही? गुरु कोणाला करावे?

 

प्रथम आपण पाहुया की, गुरु कोणाला करावे? गुरु हे अशा व्यक्तींना केले जाते की, ज्या व्यक्तींवर आपलाच आपला अंतकरणातून विश्वास आहे. ज्या व्यक्तींवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. व्यक्ती म्हणण्यापेक्षा जा देवावर किंवा व्यक्तींवर देखील ज्या व्यक्तींचे किंवा ज्या देवाचे ऐकल्यामुळे आपले चांगले होत आहे असे आपल्याला वाटत असते. अशा लोकांना आपण बोलू शकतो.

 

देवाच्या बाबतीत असे म्हणता येईल की, ज्या देवाचा मंत्रजात केल्याने, त्यांची सेवा केल्याने आपल्या मनाला मनःशांती लाभत असेल. मनामध्ये कोणताही वाईट कामाचे विचार येत नसते. की ज्यांच्या सेवेमध्ये आपण मनोभावाने भक्तीने पूजा करून आपले मन प्रसन्न होत असेल. या दोघांना आपण गुरु करू शकतो. मग त्यामध्ये स्वामी महाराज असतील किंवा गुरुदत्त माऊली असेल.

 

व्यक्तींच्या बाबतीत म्हणायचं झाले तर, आपण आपला आई-वडिलांवर आपल्या शिक्षकांवर जर आपला विश्वास असतील. आपल्याला असे वाटत असेल की, हे जे ऐकल्यामुळे आपले सर्व काही चांगले होत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण राहिले तर, आपण कामात यश मिळवू शकतो. अशा व्यक्तींना गुरु करू शकतो.

 

आता आपण पाहूया की गुरु करावे की नाही? गुरु केल्यानंतर आपल्याला वाईट कामापासून दूर राहावे लागेल. कोणत्याही मासाहाराचा सेवन करायची नसते. त्याचबरोबर कोणतेही वाईट काम आपल्यापासून होणार नाही याची देखील आपल्याला लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही व्यसन आपलाला लावून घ्यायचे नसते. अशाप्रकारे या गोष्टी जर आपल्याला कडून होत असेल तर आपण गुरु करायला हवा.

 

कारण कोणतीही व्यक्ती असो किंवा देव असतो ते आपल्याकडे येत नसतात कि, माझा तुम्ही शिष्य हो म्हणून आपण आपल्या विश्वासाच्या जोरावर आपण त्यांचे शिष्य होत असतो.म्हणून आपल्याकडून कोणत्याही प्रकारची वाईट काम होणार नाही. हे आपल्याला आयुष्यभरासाठी सोडावे लागते. याचा विचार करून आपण गुरु करावा की न करावा हे आपण ठरवावे.

 

आता आपण पाहूया की गुरु केल्याने काय होते? गुरु केल्याने निश्चितच आपण जर कोणता अडचणी असो किंवा आपल्या व कोणते संकट येत असेल तर, त्या संकटातून त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा मार्ग आपल्याला ते आपले गुरु दाखवत असतात. ते प्रत्येक कामामध्ये आपल्याला मार्ग हे दाखवतच असतात. त्यामुळे प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येईल. म्हणून गुरु करणे आपल्यासाठी आपल्या विश्वासातील व्यक्ती वर किंवा आपण ज्या देवाच्या श्रद्धेने पूजन करत असतो. त्या व्यक्तीचा किंवा त्या देवांना आपण गुरु करून घ्यावा.

 

तुम्ही देखील गुरु करणार असाल तर, नक्कीच तुम्ही ज्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवतात. किंवाज्या देवावर तुमचे मनापासून श्रद्धा आहे अशाच देवाला गुरु तुम्ही करून घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -