Thursday, December 5, 2024
Homeब्रेकिंगहे 8 मिडकॅप स्टॉक्स करतील मालामाल, तज्ज्ञ तर म्हणतात हेच मैदानातील खेळाडू...

हे 8 मिडकॅप स्टॉक्स करतील मालामाल, तज्ज्ञ तर म्हणतात हेच मैदानातील खेळाडू दमदार

शेअर बाजाराने जसे नवीन वर्षांत विक्रम नावावर केले. तसेच गुंतवणूकदारांना अनेकदा झटका पण दिला. मिडकॅप बाजार या वर्षाच्या सुरुवातीला 90 टक्क्यांहून घसरुन थेट 73 टक्क्यांवर आला. BSE Midcap Index 20 मार्च रोजीपर्यंत 4 टक्के तर बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 8 टक्क्यांपर्यंत आपटला.शेअर बाजारात सध्या फुंकून फुंकून व्यवहार करावा लागत आहे. यावर्षात विक्रमी उसळी घेतल्यानंतर बाजाराने गुंतवणूकदारांना अनेकदा हात दाखवला आहे. त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मिडकॅप (Midcap) आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

काही स्टॉक तर गेल्या 52 आठवड्यातील निच्चांकावर येऊन धडकले आहेत. पण तज्ज्ञांनिी 8 स्टॉक्सवर भरवसा दाखवला आहे. हे स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. यामध्ये रेल्वेपासून ते Small Finance Banks पर्यंतचे अनेक शेअरचा समावेश आहे. जागतिक पतमानांकन संस्था, वित्तसंस्थांनी भारतीय बाजारावर विश्वास दाखवल्याने मिडकॅपमध्ये घडामोड दिसू शकते.काय म्हणते HSBC

HSBC च्या एका अहवालानुसार, Midcap चे मूल्यांकन पहिल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा घसरले आहे. मिडकॅप मार्केट या वर्षाच्या सुरुवातीलाच 90 टक्क्यांहून घसरुन 73 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. मिडकॅप प्रीमियम जानेवारीमध्ये 30 टक्के घसरले. ते 17 टक्के उरले. याशिवाय BSE मिडकॅप इंडेक्स 20 मार्च रोजीपर्यंत 4 टक्क्यांहून अधिक आणि BSE स्मॉलकॅप इंडेक्स 8 टक्क्यांनी घसरला.8 शेअरची रॉकेट भरारी

HSBC नुसार आता घसरणीनंतर तेजीचे सत्र येऊ शकते.

Naykaa Share मध्ये 57.5 टक्के, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेत 53.8 टक्के तेजी

टीटागड रेल्वे सिस्टिम्समध्ये 40.6 टक्क्यांची तेजी येण्याची शक्यता

प्रेस्टीज एस्टेट प्रोजेक्ट्समध्ये 26.3 टक्क्यांची वाढ

कल्याण ज्वेलर्स, इप्का ज्वेलर्स, वोल्टास, फीनिक्स मिल्समध्ये 10-19 टक्क्यांच्या तेजीचा अंदाज

हे दोन शेअर पळणार सूसाट

HSBC नुसार नायकाचा BPC व्यवसाय सध्या 20 टक्क्यांच्या तेजीत आहे. त्यावर डाव लावता येऊ शकतो. याशिवाय नायका फॅशन व्यवसायात पण भरारी घेऊ शकते. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक पण तिची क्षमता दाखवेल. बँक सातत्याने व्यावसायिक पातळीवर अनेक बदल करत आहे. त्यामुळे बँकेला नफा होण्याची जास्त शक्यता आहे. या शेअरमध्ये मार्च महिन्यात जवळपास 8 टक्क्यांची घसरण झाल्याचे HSBC ने सांगितले आहे.

एका वर्षात बाजाराची मोठी झेप

एका वर्षात शेअर बाजाराने मोठी घौडदौड केली. सेन्सेक्स 24.78 टक्के वा 14,425 अंकांनी वधारुन 72,641 स्तरावर पोहचला आहे. तर निफ्टीमध्ये 28.34 टक्के वा 4,860 अंकांची वाढ झाली. Nifty 22,011 वर व्यापार करत आहे. बँक निफ्टी पण एका वर्षात 16.72 टक्के चढला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -