Friday, July 25, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : खाजगी सावकारी प्रकरणाचे आणखी व्याप्ती वाढणार

इचलकरंजी : खाजगी सावकारी प्रकरणाचे आणखी व्याप्ती वाढणार

 

मुद्दल रक्कमेची व्याजासह परतफेड केल्यानंतरही पैशांसाठी तगादा लावणाऱ्या खाजगी सावकारी प्रकरणाच्या तपासाची चक्रे शिवाजीनगर पोलिसांनी गतीमान केली आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संजयकुमार रायगोंडा सांगले (रा. दानोळी) यांनी इचलकरंजीतील सुनिता भबीरे व ज्योत्सना पाटील यांच्या विरोधात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांच्याकडे तक्रार दिली होती. तक्रारीची दखल घेत पथकाद्वारे तपासाच्या सूचना निबंधकांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने संशयित महिलांच्या घराची झडती घेतली असता वेगवेगळ्या बँकांचे विविध व्यक्तींच्या स्वाक्षरी असलेले ११ धनादेश व दोन नोंद वह्या जप्त केल्या होत्या.

या प्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगलेचे मुख्य लिपीक फिरोज दस्तगीर जमादार यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, तपास अधिकारी हे न्यायालयीन कामकाजामुळे परगांवी गेल्याने आज तपास होऊ शकला नाही. मात्र या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -