Thursday, July 24, 2025
Homeइचलकरंजीहुपरी : 'त्या' बँकेच्या शाखाअधिकाऱ्याला अटक

हुपरी : ‘त्या’ बँकेच्या शाखाअधिकाऱ्याला अटक

कर्जासाठी तारण ठेवलेल्या ७ लाख ८० हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी हुपरीतील आप्पासाहेब नाईक पैसाफंड शेतकी सहकारी बँकेच्या रांगोळी शाखाधिकारी अनिता सतिश फडतारे (रा. हुपरी) यांना येथील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेच्या रांगोळी शाखेत ३ ग्राहकांनी कर्जापोटी ठेवलेल्या २ लाख २७ हजार १७५ रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या गहाण ठेवल्या होत्या. बँकेचे डेली ऑडीटर आर. बी. शिंपुकडे हे बँकेच्या रांगोळी शाखेत ऑडीटसाठी गेले असता सोने तारण जिन्नसमधील ३ जिन्नस कमी असल्याचे आढळले. याबाबतची माहिती शिंपुकडे यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयास दिली. त्यानुसार बँकेकडून फडतारे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे दागिने गहाळ झाल्याचे सांगितले.

त्यानंतर वेळ देऊनही फडतारे यांनी गहाळ दागिने बँकेत जमा न केल्याने बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक शिरीष सुभाण्णा आवटे (वय ४९, रा. पट्टणकोडोली) यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आज फडतारे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता २४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -