आयपीएलचं 17 वं पर्व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानात खेळला जाणार आहे. हा सामना विराट कोहलीसाठी खास असणार आहे. या सामन्यात विराट कोहली टी20 क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.विराट कोहली टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करण्याच्या अगदी जवळ आहे. यासाठी त्याला फक्त 6 धावांची गरज आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात 6 धावा करताच विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम प्रस्थापित होणार आहे.टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि फ्रेंचायसी लीगमध्ये 11994 धावा केल्या आहेत. त्यामुळे 6 धावा करताच नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे. आतापर्यंत 5 फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 237 आयपीएल सामन्यात 37.25 च्या सरासरीने 7263 धावा केल्या आहेत. मागच्या पर्वातही त्याने 639 धावा केल्या होत्या.विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकले आहेत. आयपीएलच्या 237 सामन्यात 7 शतकं नावावर केली आहेत. तसेच एकाच पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. 2016 मध्ये त्याने 973 धावा केल्या होत्या.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.