Sunday, July 27, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत उन्हाचा तडाखा : पंखे, कुलर, एसी, फ्रिजला मागणी वाढली

इचलकरंजीत उन्हाचा तडाखा : पंखे, कुलर, एसी, फ्रिजला मागणी वाढली

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

 

इचलकरंजी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे पंखे कुलर एसी फ्रिज अशा वस्तूंची मागणी प्रचंड वाढले आहे. तर याच वस्तूंची दुरुस्ती देखील करण्यासाठी इलेक्ट्रिक दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी थंडी आणि साधारण सकाळी दहा वाजल्यापासून सूर्याची वाढणारी तीव्रता यामुळे वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण होत आहे. या उष्णतेमुळे नागरिक हैराण होत आहेत. या वातावरणात वृद्ध नागरिक तसेच लहान मुलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

 

हे सर्व पाहता प्रत्येकाच्या घरी याचा या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी पंखे, कुलर, एसी, फ्रिज अशा वस्तूंची प्रचंड मागणी वाढत आहे. तर अनेक मंडळी आपल्या घरातील वर्षानुवर्षी सुरू असलेल्या या वस्तू दुरुस्त करून अथवा जे पार्ट खराब झाले आहेत ते बदलून पुन्हा वापरताना दिसत आहेत.

 

दरम्यान या सर्वामुळे आता पंखे, कुलर, एसी, फ्रिज विक्री व रिपेरी करणाऱ्यांचा सीजन जोरात सुरू होत आहे. आणि या सर्वांनी विक्री तसेच रिपेअर साठी तयारी देखील मोठी करून ठेवली आहे. परिणामी उन्हाची वाढती तीव्रता पाहता या वस्तूंना आणखी कितीतरी पटीने मागणी वाढणार हे आता दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -