गेल्या काही दिवसांपासून हातकणंगलेच्या विविध भागांत भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याने प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेतली असून आज नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांना जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आज सकाळी डझनभर कुत्री जेरबंद केली असून एक दिवसाआड ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
प्रशासनाने अखेरीस भटक्या कुत्र्यांना जेरबंद करण्याची मोहिम आज पासून हातात घेतली आहे. यामुळे लोकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या काही महिन्या पासून हातकणंगलेत मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. त्यांच्या हल्यात शाळकरी विद्यार्थ्यापासून ते वयोवृद्धा पर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत. नुकताच कुत्र्यांनी तिघांचा चावा घेतला.
याबाबत सोशल मिडीया वरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती . याची दखल घेत प्रशासनाला याबाबत निर्णय घेणे भाग पडले.