येथील औद्योगिक वसाहतीमधील एका अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यात आज सकाळी शॉर्टसर्कीटने आग लागली. महापालिकेच्या अग्शिनमन दलाने अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
येथील औद्योगिक वसाहतीमधील रात्र महाविद्यालया जवळील अत्याधुनिक यंत्रमाग कारखाना विनायक निकम हे चालवतात. या कारखान्यात आज सकाळी शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. त्यामुळे तातडीने कामगारांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधला. बघता बघता वेस्टेज कापूस, सुताची वाचकी आणि स्पेअरपार्टला आग लागली. अग्रिशमन दलाचे दोन बंब दाखल झाले. अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेत सूताची बाचकी, स्पेअरपार्ट आणि वेस्टेज कापूस यासह अन्य साहित्य जळाल्याने सुमारे १० ते १२ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.